Kolhapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: भयंकर रिक्षाचालकाने महिलेला नेलं फरपटत; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद

Crime News: सदर घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Kolhapur Accident News: कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेची रिक्षामध्ये साडी अडकल्याने तिला दूरवर फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर महिला रिक्षाने प्रवास करत होती. रिक्षातून खाली उतरल्यावर तिच्यात आणि रिक्षा चालक व्यक्तीमध्ये वाद झाला. रिक्षाचे भाडे देण्यावरून हा वाद झाला होता.

वाद मिटल्यानंतर रिक्षाचालक निघून जात असताना ही घटना घडली आहे. महिला फरफटत येत असल्याची कल्पना नसल्याचं रिक्षाचालकाने म्हटलं आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रहदारीच्या वेळी महिला रिक्षाच्या मागे अडकून फरपटत चालली आहे.

महिला फरपटत जात असल्याचं पाहून रस्त्यावरील नागरिकांनी महिलेच्या दिशेने धाव घेतली. नागरिकांनी धावून गेल्याने रिक्षा (Auto) चालकाने रिक्षा थांबवली. रिक्षा थांबेपर्यंत बराच वेळ झाला होता. त्यामुळे यात महिला गंभीर जखमी झाली. उपस्थितांनी तात्काळ महिलेला जवळील रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

SCROLL FOR NEXT