kolhapur Crime News
kolhapur Crime News  saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime : कोल्हापुरात गर्भलिंग निदान रॅकेटचा भांडाफोड; पोलिसांनी मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगांवकर

kolhapur crime News : कोल्हापुरातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. कोल्हापुरात पोलिसांनी गर्भलिंग निदान रॅकेटवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. आतापर्यंत १० हून अधिक जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात (Kolhapur) गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला आहे. मुख्य सूत्रधार दिलीप पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्रासह सीमाभात रॅकेट चालवत होता. १५ लाखांचे सोनोग्राफी मशीनही जप्त केले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी (Police) आतापर्यंत या प्रकरणात दहा जणांना अटक केली आहे.

दरम्यान, कोल्हापुरात १७ जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेट उघडकीस आले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणात कर्नाटकातून एका बोगस डॉक्टरला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे.

कोल्हापूर बनलंय गर्भलिंग निदान चाचणीचं हब

पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड आणि राधानगरी येथील गर्भलिंग निदान चाचणी केंद्राचं बिंग फोडलं. पोलिसांनी या केंद्रावर पेशंट बनून छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना छाप्यात आतापर्यंत गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे मशीन आणि गर्भपाताची औषधे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात दहा जणांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : महाराष्ट्रात मराठी माणसाला अशी वागणूक, म्हणे 'नॉट वेलकम'! मराठी तरूणाच्या मनाला काय वाटलं? वाचा

Today's Marathi News Live : PM मोदी देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी आणणार- फडणवीस

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

Kesar Benefits : केसरचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

SCROLL FOR NEXT