Kolhapur Six Female Performers Try to End Lives Saam
महाराष्ट्र

Kolhapur: ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नस कापल्या अन्...; कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर घडलं

Six Female Performers Try to End Lives: कोल्हापुरात सहा नृत्यांगणांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bhagyashree Kamble

  • कोल्हापुरात भयंकर घडलं

  • ६ नृत्यांगणांनी हाताच्या नसा कापल्या

  • महिला सुधारगृहात उचललं टोकाचं पाऊल

रणजीत माजगावकर, साम टिव्ही

कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सहा नृत्यांगणांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हाताच्या नसा कापून घेत त्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सहा नृत्यांगणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या अधिक तपास सुरू आहे.

सहा नृत्यांगणा या कोल्हापुरात वास्तव्यास होत्या. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी काही गुन्ह्यांखाली सहा नृत्यांगणांवर कारवाई केली होती. तसेच त्यांना ताब्यात घेतलं होतं. कोल्हापूर पोलिसांकडून सहा नृत्यांगणांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. मात्र, आज सहा नृत्यांगणांनी मिळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

६ नृत्यांगणांनी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हाताच्या नसा कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच याबद्दलची माहिती महिला सुधारगृहात पसरली. त्यांना तातडीने जवळच्या सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सहा जणांनी मिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? सामुहिक आयुष्य संपवण्यामागचं कारण काय? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी याची माहिती देण्यात आली. सध्या अधिक तपास सुरू आहे.

कोल्हापूरच्या स्वागत कमानीचा धोकादायक भाग उतरविला

कोल्हापूर शहराच्या तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या कमानीचा धोकादायक भाग कटर आणि इतर सामग्रीच्या साह्याने उतरवला आहे. आता ही पूर्ण कमान येत्या दोन ते तीन दिवसांत वाहतुकीचे नियोजन करून उतरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी या कमानीची पाहणी केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कमान उतरवण्याचे काम जलद गतीने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT