Kolhapur MLA Shivaji Patil targeted in shocking honey trap case saam tv
महाराष्ट्र

Honey Trap: मोठी बातमी! बहीण-भावाचा हनी ट्रॅपचा प्लॅन; आमदाराशी मैत्री करत मोबाईलवर पाठवले अश्लील चॅट अन् व्हिडिओ

Kolhapur Honey Trap: कोल्हापूर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेल प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झालाय. त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी बहीण भावाला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघातील आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅपचा बळी ठरले.

  • भाऊ-बहिणीने अश्लील चॅट आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिला.

  • आरोपींनी आमदारांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली.

विकास काटे, साम प्रतिनिधी

कोल्हापूरमधून एक मोठी बातमी येत आहे. आमदारालाच हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलीसह एका तरुणाला अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपी बहीण-भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न बहीण-भावाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात मांडेदुर्ग गावातील एका बहिण-भावाला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन जोतिबा पवार (२६) व त्याची बहिण शामल जोतिबा पवार (२६) अशी या दोघांची नावे आहेत. गेल्या वर्षभरात या दोघांनी आमदार पाटील यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून अश्लील चॅट, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिला होता. एवढेच नव्हे तर “राजकीय प्रतिमा मलिन करू” अशी धमकी देत दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.

आमदार शिवाजी पाटील यांनी सततच्या या त्रासामुळे ८ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर ठाणे आणि कोल्हापूर पोलिसांनी संयुक्त तपास करून मांडेदुर्ग गावातून दोघांना अटक केली. आरोपी मोहन पवार आणि त्याची बहीण शामल यांनी ‘मैत्रीच्या’ नावाखाली आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधून, नंतर अश्लील मजकूर पाठवत हनी ट्रॅपचा कट रचला होता. सुरुवातीला आमदारांनी त्रास सहन करून संबंधित नंबर ब्लॉक केले, मात्र आरोपींनी नवीन नंबर वापरून त्रास सुरू ठेवला.

गुन्हा उघड झाल्यानंतर आरोपी मोहन पवार स्वतः आमदारांच्या कार्यालयात हजर होऊन “माझी चूक झाली, माफ करा” अशी विनंती केली, परंतु पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत बहिणीचा सहभागही स्पष्ट झाल्याने तिलाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्या सेरेना मस्कर हिने युथ एशियाई कबड्डी स्पर्धेत मिळवले गोल्ड मेडल

ISRO LVM3 Launch : भारताची ताकद वाढली, इस्रोची 'बाहुबली' झेप! LVM3 रॉकेटने रचला इतिहास |VIDEO

Ladki Bahin Yojana: वडील आणि पती दोघेही हयात नाहीत, लाडक्या बहिणींनी eKYC कशी करायची? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भयंकर! पोटच्या २ मुलांकडून आई वडिलांची हत्या; घरातच दोघांना संपवलं, कारण फक्त..

Metro Job Vacancy: मेट्रोमध्ये काम करण्याची मोठी संधी, ऑनलाईन अर्ज कुठे कराल? सोपी पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT