Kolhapur : कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन SaamTV
महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

चंद्रकांत जाधव हे कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2019 ला जाधव हे पहिल्यांदाच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते.

संभाजी थोरात साम टीव्ही कराड

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस (Congress) आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावरती उपचार सुरु असतानाच हैदराबाद येथे निधन झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं, त्यांच्यावरती उपचार सुरु होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

हे देखील पहा -

चंद्रकांत जाधव हे कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2019 ला जाधव हे पहिल्यांदाच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. दरम्यान आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव हैदराबादमधून कोल्हापुरात आणण्यात येणार असल्य़ाचे समजत आहे.

जाधव यांना दोन वेळा कोरोनाची (Corona) लागण झाली होती. त्यातूनही ते बरे झाले होते. मात्र त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार सुरू असताना वयाच्या 57 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

साखरपुड्यानंतर घराकडे येताना काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी बोलवावा लागला JCB

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Gold Price Today : खुशखबर! दिवाळीपूर्वी सोने-चांदी झालं स्वस्त! ग्राहकांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या आजचा भाव

SCROLL FOR NEXT