Kolhapur News: कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. औरंगजेबाच्या फोटोवरून शहरात दोन गटांमधील वाद विकोपाला गेला आहे. हिंदुत्ववादी संघटनेतील व्यक्ती मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने आंदोलन चिघळलं आहे. अशात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झालाय. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमाव रस्त्यावर उतरलाय. रस्त्यावर उतरत जमावाने दगडफेक देखील केली आहे. त्यामुळे आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळलं आहे. परिस्थीती नियंत्रणाबाहेर जात असल्याने जमाव पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
कोल्हापुरात (Kolhapur) काही युवकांनी वादग्रस्त स्टेटस ठेवले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यातून दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या. परिणामी कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पाेलिसांची माेठा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र परिस्थिती चिघळल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येत आहे.
कोल्हापुरातील वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. "गोष्टी आम्हाला समजताहेत. जे चुकीचे आहे ते खपवून घेतले जाणार नाही. अचानकपणे औरंगजेब, टिपू सुलतान यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात उदात्तीकरण होणे हा काही याेगायाेग नाही. हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. विराेधी पक्षाकडून वारंवार दंगली घडविण्याचा प्रयत्न होतोय. तसेच औरंगजेबचे उदात्तीकरण कसे होत आहे याचा तपास सुरु असल्याचं, फडणवीसांनी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.