Kolhapur Panchganga Water Level Danger Level Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Panchganga River: कोल्हापूरकरांसाठी धोक्याची घंटा! पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; प्रशासन अलर्ट मोडवर

Panchganga River Water Level: कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सततच्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीला मोठा पूर आला असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Kolhapur Panchganga Water Level Danger Level: गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सततच्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीला मोठा पूर आला असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुट 03 इंचावर गेली असून नदीच्या धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट झाल्या असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

कोल्हापुरातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका असून या गावातील लोकानां स्थलांतरीत होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यामध्ये शाहूवाङी, पन्हाळा, करवीर, भुदरगड, गडहिंग्लज, राधानगरी, कागल, आजरा, चंदगड आदी तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

तर पन्हाळा : बडेवाडी डोंगर, पोहाळवाडी दरड, गिरोली जोतिबा दरड, पावनगड दरड, मंगळवार पेठ ते पन्हाळा दरड, बुधवार पेठ परिसर मुख्य रस्ता, मौजे मराठवाडी, म्हाळूंगे, ॲडव्हेंचर पार्क, आपटी आदी गावांचा समावेश आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT