Rain Alert in state : पुढील ५ दिवस राज्यात पाऊस कसा असेल? उद्या ७ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोल्हापूरकरांचं टेंन्शन वाढलं

Rain Update in State : कोकण, मध्य महाराष्ट्र व पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार-अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.
IMD Predict Mumbai Heavy Rain Alert
IMD Predict Mumbai Heavy Rain AlertSaam TV
Published On

Rain Forecast : राज्यात अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई, ठाण्यासह अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. अनेक पिकं वाहून गेल्याने शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. अशी सगळी परिस्थिती असताना पुढचे काही दिवस राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र व पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार-अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

IMD Predict Mumbai Heavy Rain Alert
SaptKund waterfall News : मामा-भाचे सप्तकुंड धबधब्यावर फिरायला गेले, सेल्फीचा मोह झाला अन् भलतंच घडलं

उद्या ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

उद्या राज्यातील ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Latest News)

IMD Predict Mumbai Heavy Rain Alert
Pune Dam Water Level Today: पुणेकरांचा पाणीप्रश्न सुटणार?; वाचा धरणातील सध्याचा पाणीसाठा किती?

कोल्हापुरात पंचगंगेने टेन्शन वाढवलं

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला होता. मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट 7 इंचावर पोहोचली आहे. काही तासातच पंचगंगा 39 फुटांची इशारा पातळी गाठण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बत 82 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com