SaptKund waterfall News : मामा-भाचे सप्तकुंड धबधब्यावर फिरायला गेले, सेल्फीचा मोह झाला अन् भलतंच घडलं

Chhatrapati Sambhajinagar News : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटनासाठी गेलेल्या २७ वर्षीच तरुणांचा पाय घसल्याने सप्तकुंड धबधब्यात पडला.
Auarangabad News
Auarangabad News Saam TV
Published On

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने (Heavy Rain) जोरदार हजेरी लावली आहे. अनेक धबधबे देखील ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकाचे पायही तिथे वळू लागले आहे. मात्र काही चुकांमुळे अपघाताच्या घटनामध्येही वाढ झाली आहे. अशीच एक घटना जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथील धबधब्यावर घडली आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटनासाठी गेलेल्या २७ वर्षीच तरुणांचा पाय घसल्याने सप्तकुंड धबधब्यात पडला. या ठिकाणी असलेल्या अनिल रावळकर याच्या लक्षात आल्यावर अजिंठा लेणीतील सुरक्षारक्षक व पोलिसांना संपर्क करत तात्काळ शर्यतीचे प्रयत्न करून तरुणाला वाचवण्यात यश आले.  (Latest Marathi News)

Auarangabad News
Buldhana News: जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरण फुटल्याची अफवा; 'साम'ची टीम पोहोचली थेट धरणावर

अजिंठा लेणी परिसरात गेल्या ४ ते ५ दिवसापासून पाऊस पडत असल्याने सप्तकुंड धबधबा धो-धो कोसळत आहे. आजही पाऊस सुरू असल्याने निसर्गरम्य वातावरण व लेणी पाहण्यासाठी सोयगांव येथील मामा व भाचे येथे पर्यटनाला आले होते. (Maharashtra News)

Auarangabad News
Radhakrishna Vikhe on AJit Pawar : अजितदादांच्या येण्याने सरकारच्या निर्णय क्षमतेला गती आली : राधाकृष्ण विखे पाटील

दुपारी २ वाजेच्या सुमारास गोपाल पुंडलिक चव्हाण त्याचा भाच्यासह आला होता. मात्र सेल्फीच्या नादात त्याचा पाय घसरल्यामुळे तो सप्तकुंडात पडला. मात्र सुदैवाने तिथे असलेल्या सुरक्षारक्षक रस्सीच्या साहाय्याने वर घेतलं आणि त्याचा जीव वाचवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com