Kolhapur Video Saam Tv
महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये स्मशानभूमीत काळीजादूचा प्रकार, महिला आणि पुरुष नग्नावस्थेत करायचे करणी, भानामती; घटना सीसीटीव्हीत कैद

Kolhapur News : कोल्हापूरातील उदगाव येथील कृष्णा नदीकाठावरच्या स्मशानभूमीत करणी, भानामतीसारखा अघोरी प्रकार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Yash Shirke

रणजीत माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला आणि पुरुषांकडून नग्न होऊन करणी, भानामतीसारखी अघोरी कृत्ये केली जात असल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार सुरु असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. कारवाईसाठी हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उदगावमधील कृष्णा नदीकाठावर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत मागील काही दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरु होता.

कृष्णा नदीकाठावर घाटावर महिला आणि पुरुष भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीसारखे विधी करत होते. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरील रक्षा बाजूला सारून त्याठिकाणी बाहुली, नारळ यांची पूजा केली जात होती. नावाच्या चिठ्ठयांना सुया टोचून करणी करण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.

स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. करणी, भानामतीसारखे अघोरी प्रकार सुरु असल्याची माहिती समोर आल्याने उदगाव पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. सदर सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane News : संतापजनक! ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी, रिक्षामध्ये तरुणीला मारण्याचा प्रयत्न

Tarkarli Tourism: पावसाळ्यात फिरायला जायचा प्लान करताय? मग तारकर्ली ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन

Radhika Yadav: तिला वेश्या व्यवसाय करायला लाव..., बॅटमिंटनपटू राधिकाच्या वडिलांना मित्रांकडून टोमणे; जिवलग मैत्रिणीचा दावा

Bhushi Dam: लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी; पाहा,VIDEO

डाळ शिजवताना त्यावर पांढरा फेस का येतो ?

SCROLL FOR NEXT