रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी
डोक्यावर हेल्मेट असले तर अपघातात इजा कमी होते. मृत्यू होण्यापासून बचाव होतो. परंतु डोक्यावर हेल्मेट असून कोल्हापुरातील उद्योजकाचा मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा दरम्यान झालेल्या बाईकच्या अपघातात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा मृत्यू झालाय. सिद्धार्थ विलास रेडेकर, असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
सिद्धेश रेडेकर कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता. सिद्धार्थ बाईकर्स होता. बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा मुलगा होता. सिद्धार्थकडे १२ लाख रुपयांची बाईक होती, तर सुरक्षा म्हणून तो ७० हजार रुपयांचं हेल्मेट वापरत असायचा. परंतु हजारो रुपये खर्चूनही बायकर्सचा जीव वाचला नाहीये. सिद्धार्थ हा एकुलता एक होता.
सिद्धार्थ बायकर्स असल्याने नेहमीच फेरफटका करण्याची सवय होती. तसेच त्याला फोटोग्राफीची सुद्धा आवड होती. नेहमीप्रमाणे सिद्धार्थ रेडेकर हा चार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत चार मित्र सुद्धा सोबत होते. काल सकाळी 11 वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असताना एका धोकादायक वळणावर सिद्धेशच्या बाईकचा अपघात झाला. कोल्हापूरहून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा कार आणि सिद्धेशच्या बाईकची समोरासमोर धडक बसली.
ही धडक इतकी भयानक होती की, सिद्धेशच्या डोक्यावरील हेल्मेटचे दोन तुकडे झाले. ते रस्त्याच्या कडेला तुटून पडले. या धडकेमध्ये सिद्धेशच्या हात, छातीला तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर सिद्धेशला तातडीने गडहिंग्लजमध्ये खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत माळवली. अत्याधुनिक हेल्मेट डोक्यावर असताना सुद्धा असताना त्याचे तुकडे झाले होते. या हेल्मेटला कॅमेरा सुद्धा होता. त्यामुळे आता कॅमेरामधून काही माहिती समोर येते का याकडे लक्ष असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.