kolhapur airport  
महाराष्ट्र

विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूरसह नागपूरकरांना दिली खूषखबर

Siddharth Latkar

सातारा : कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाने आज काेल्हापूरवासियांसह नागपूरकरांना एक खूषखबर दिली आहे. येत्या १७ ऑगस्ट पासून काेल्हापूर अहमदाबाद विमान सेवा सुरु केली जात आहे. विशेष म्हणजे हे विमान नागपूरला देखील जाणार असल्याची घाेषणा करण्यात आली आहे.

कोल्हापूर विमानतळवरुन kolhapur airport विविध ठिकाणी विमानाच्या उड्डणांची प्रवाशांची मागणी आहे. त्यानूसार विमानतळ प्राधिकरणाने वाटचाल सुरु ठेवली आहे.

एका प्रवाशाने नुकतेच काेल्हापूर विमानतळ व्यवस्थापनाचे कौतुक केले हाेते. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. हे विमानतळ एक महत्वाचे विमानतळ बनले आहे. येथे सुरक्षिततेच्या सर्व पावले उचलली गेली आहेत. ज्या गतीने हे विमानतळ विकसित होत आहे ते पाहून या ठिकाणी लवकरच मोठी विमानांचे देखील येथून उड्डाण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली हाेती.

यापुर्वी पासून काेल्हापूर विमानतळावरुन मुंबई, तिरुपती, हैदराबाद, बंगळरु या ठिकाणी विमानसेवा सुरु आहे. काेल्हापूर विमानतळ प्राधिकरणास नुकताच इंडिगाे कंपनीने एक संदेश पाठविला आहे. या संदेशात त्यांनी येत्या १७ ऑगस्ट पासून काेल्हापूर अहमदाबाद अशी सेवा करीत असल्याचे नमूद केले. हे विमान नागपूरला देखील जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना नागपूरसाठी विमान बदलण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान हे विमान सकाळी साडे दहा वाजता काेल्हापूरहून येथून उड्डाण करेल. दुपारी १२.४० वाजता ते अहमदाबादला पाेहचेल. तेथे सुमारे ३५ मिनीट थांबेल. त्यानंतर दुपारी एक वाजून १५ मिनीटांनी विमान अहमदाबादहून नागरपूरला जाईल. सुमारे तीन वाजून २५ मिनीटांनी ते नागपूरला पाेहचले असे इंडिगाेने आपल्या संकतस्थळावर नमूद केले आहे.

या निर्णायामुळे नागपूर ते कोल्हापूर प्रवास करण्याची इच्छा असलेल्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर; व्हिडीओ कॉल करणं आता झालं अधिक सोपं

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न - महेश गायकवाड

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

Viral Video: रिल्सच्या नादात जीवाशी खेळ, उंच पुलावरून चालत चालत निघाला, मग पुढे काय झालं तुम्हीच पाहा

IPL 2025 Mega Auction: इटलीचा हा स्टार IPL ऑक्शन गाजवणार! मुंबई इंडियन्ससोबत आहे खास कनेक्शन

SCROLL FOR NEXT