kolhapur airport  
महाराष्ट्र

काेल्हापूर विमानतळ प्राधिकरणाची प्रवाशांसाठी खूषखबर

कोल्हापुरातून नवीन फ्लाईटस सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल आहे असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : दाेन दिवसांपुर्वी काेल्हापूर विमानतळाचा परवाना संपला हाेता. त्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज करताना काेल्हापूर विमानतळ (kolhapur airport) प्राधिकरणाने विमानतळावरील अपग्रेडेशनचा प्रस्ताव पाठविला हाेता. त्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे आता कोल्हापूर विमानतळावरुन कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही विमान उतरू किंवा टेक ऑफ करू शकते. यापूर्वी, विमानतळाचा परवाना फक्त दिवसा विमानांच्या उड्डाणासाठी हाेता.

छत्रपती राजाराम महाराज विमानतळ (काेल्हापूर विमानतळ) याचे संचालक कमलकुमार कटारिया म्हणाले आम्ही विमानतळाच्या अपग्रेडसाठीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार आता परवाना ‘3C IFR’ श्रेणीत सुधारित झाला आहे. यामुळे विमानांची दृश्यमानता तीन हजार मीटरपेक्षा जास्त असली तरीही उपकरणाच्या मदतीने विमानतळावरून विमान उतरू आणि टेक-ऑफ करू शकतात. यापूर्वी व्हिज्युअल फ्लाइट नियमानूसार पाच हजार मीटरपेक्षा जास्त स्पष्ट दृश्यमानता असतानाच विमान टेक ऑफ किंवा उतरू शकत होते.

याचा परिणाम बर्‍याचदा विमानांच्या वेळापत्रकावर हाेत असे. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत हाेती. दरम्यान फ्लाइट ऑपरेशन्सवर सध्या बारीक नजर ठेवली जात आहे. काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील. काेणत्याही प्रकारची अडचण जाणवली नाही तर नाईट लँडिंगची प्रक्रिया आणखी गतीमान होईल असा विश्वास कटारिया यांनी व्यक्त केला.

IFR ला परवाना नूतनीकरण केल्याने तसेच श्रेणीसुधारित वाढ झाल्याने कोल्हापूर विमानतळाच्या विकासाचा हा महत्वपुर्ण निर्णय झालेला आहे. लवकरच नाईट लँडिंगची परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे कटारिया यांनी नमूद केले.

पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) म्हणाले, “विमानतळाच्या जलद विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नाईट लँडिंग प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक पूर्ण झाला आहे. कोल्हापुरातून नवीन फ्लाईटस सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Son Of Sardaar 2 Release Date : अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'ची तारीख बदलली, 'या' चित्रपटासोबत होणार कांटे की टक्कर

Maharashtra Live News Update: पुणे शहराचा पाणी पुरवठा आज विस्कळीत

Horoscope Sunday Update : दवाखाने मागे लागतील, विनाकारण खर्च होईल, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे -फडणवीस भेट ही अफवा... स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, वाचा

Electrolyte Drink: मधुमेही रुग्णांसाठी इलेक्ट्रोल पावडर योग्य आहे का? जाणून घ्या फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT