Wreckage of two-wheelers and an overturned Creta car at Shahu Mill Chowk, Kolhapur, after a high-speed crash that claimed two lives. saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Accident: भीषण अपघात! भरधाव कारनं ३ दुचाकींना उडवलं; दोन जण जागीच ठार, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Kolhapur Horrific Road Accident: कोल्हापूरमधील शाहू मिल चौकात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने तीन दुचाकींना धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav

  • कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भीषण अपघात

  • भरधाव क्रेटा कारने तीन दुचाकींना दिली धडक

  • दोन जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

रणजित माजगावकर, साम प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. धडकेनंतर दुचाकीस्वार दूरवर फेकले गेले तर अपघातग्रस्त क्रेटा कार घटनास्थळीच उलटी झाली. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

सायबर चौकातून शाहू मिल चौकाच्या दिशेने येताना कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गंभीर जखमीवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त क्रेटा कार नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. तिन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झालाय. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी जमा केली आहेत. या वाहनांची दशा पाहता हा अपघात किती भीषण होता याची प्रचिती येते. दुचाकींचा चुराडा झालाय, तर चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, बस महामार्गावर उलटली

राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये लग्नाचं वऱ्हाड होतं. मिळलेल्या माहितीनुसार, सज्जनगड पोलीस स्टेशन परिसरातील सांडलाई गावातील हे वऱ्हाड होतं. वर आणि वधू एका चारचाकीमधून रवाना झाल्यानंतर इतर पाहुणेमंडळी बसमधून घरी जाण्यासाठी रवाना झाले. संध्याकाळी ६:३० च्या सुमारास या वऱ्हाडच्या बसचा अपघात झाला.

घोटिया अंबा परिसरातील उतारावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ४४ जण गंभीर जखमी झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT