KOLHAPUR STUDENT SUICIDE: 19-YEAR-OLD ENGINEERING STUDENT ENDS LIFE OVER FAMILY DISPUTE Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : कोल्हापूर हादरलं! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Kolhapur Student Sucide News : कोल्हापुरातील १९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Alisha Khedekar

  • कोल्हापुरात १९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची आत्महत्या

  • किरकोळ कारणातून आत्महत्या

  • कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

  • विद्यार्थ्यांमधील वाढता ताणतणाव पुन्हा अधोरेखित

रणजित माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur Engineering Student Sucide News कोल्हापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लक्षतीर्थ वसाहत येथे एका १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. वडिलांनी आणि भावाने कॉलेजमध्ये नेवून सोडले नाही म्हणून तरुणाने संतापाच्या भरात हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साईराज पांडुरंग हुंबे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो शहरातील नामंकित कॉलजेमध्ये इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सकाळी वडिलांनी आणि भावाने कॉलेजमध्ये नेवून सोडले नाही, यामुळे साईराज संतापला होता. या किरकोळ कारणातून निर्माण झालेल्या नैराश्यातून त्याने राहत्या घरात छताच्या पंख्याला इलेक्ट्रिकल वायरच्या साहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. साईराजचे वडील पांडुरंग हुंबे हे खाजगी फर्म आणि व्यावसायिकांकडे बागकामाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर विशेष भर दिला होता. साईराज हा त्यांच्या तीन मुलांपैकी एक असून तो शिक्षणातही चांगली प्रगती करत होता, असे शेजाऱ्यांनी सांगितले. अशा किरकोळ कारणावरून एका तरुणाने जीवन संपवल्याने चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांमधील वाढता ताणतणाव आणि नैराश्य ही गंभीर समस्या बनत चालली असून पालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालहून साईंच्या दर्शनासाठी आली, पण मंदिरात कंत्राटी कर्मचाऱ्याकडूनच विनयभंग, आरोपी पठाणच्या आवळल्या मुसक्या

Maharashtra News Live Update: वाशिममध्ये गोठ्याला भीषण आग; तीन बैलांचा होरपळून मृत्यू, लाखोंचे नुकसान

Skin Care: जर तुम्हाला ग्लोईंग सॉफ्ट त्वचा पाहिजे? तर संध्याकाळी एक चमचा खा हे पाच सीड्स

पावसाळ्यात नेसा 'या' 5 हलक्या फुलक्या साड्या

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांना मारहाण; अज्ञात व्यक्तीने कानशिलात लगावली, VIDEO

SCROLL FOR NEXT