Manasvi Choudhary
पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असल्याने केस सुकण्यास वेळ लागतो आणि अशा वेळी हेअर ड्रायरचा वापर करतात. मात्र हेअर ड्रायरचा अतिवापर केल्याने केसांचा पोत बिघडू शकतो.
ड्रायर वापरण्यापूर्वी नेहमी हीट प्रोटेक्टंट स्प्रे किंवा सीरम लावा. यामुळे केसांचे उष्णतेपासून संरक्षण होते.
ड्रायर नेहमी मध्यम किंवा लो मिडियमवर सेट करा. ड्रायर केसांपासून किमान ६ ते ८ इंच लांब ठेवा, जेणेकरून थेट उष्णतेमुळे केस जळणार नाहीत.
शक्य असेल तेव्हा केस टॉवेलने हलक्या हाताने पुसून घ्या. ड्रायरचा वापर फक्त गरजेच्या वेळी आणि थोड्या काळासाठीच करा.
ड्रायर वापरण्यापूर्वी केस टॉवेलने पूर्णपणे कोरडे करा. केस खूप ओले असताना ड्रायर वापरल्याने केसांमधील ओलावा कमी होतो आणि केस कोरडे-निर्जीव दिसतात.
ड्रायरमधील 'कूल शॉट' बटण वापरा यामुळे केसांचे क्यूटिकल्स बंद होण्यास आणि केसांमध्ये चमक येण्यास मदत होते.