Shreya Maskar
साचलेल्या पाण्यात डास वेगाने वाढतात, त्यामुळे घरा शेजारी कुठे पाणी साचलेले डबके असेल तर त्यात माती टाका. तसेच बाल्कनतील कुंड्यांच्या तळाशी असलेल्या बशा, बादल्या यांच्यात साचलेले पाणी वेळोवेळी रिकामे करा आणि घासून स्वच्छ करा.
कापूरच्या वड्या जाळा. कापूरचा तीव्र सुगंध डासांना त्वरित दूर करतो आणि हवा ताजी ठेवतो.
लिंबू मधून कापून त्याचे दोन भाग करा आणि त्यातील उघड्या पडलेल्या गरमध्ये काही अख्ख्या लवंगा टाका. हे तुकडे घराच्या कोपऱ्यात, खिडक्यांजवळ किंवा बेडसाइड टेबलवर ठेवा.
घराबाहेर पाणी साचलेले खड्डे असतील, तर त्यावर कॉफी पावडर किंवा वापरून वाळवलेली कॉफी पावडर टाका. यामुळे डास, माशी, मच्छर नष्ट होता.
कडुनिंबाच्या तेलाचे काही थेंब खोबरेल तेलात मिसळा आणि उघड्या त्वचेवर लावा. कडुनिंब हा डास दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे.
शुद्ध आणि स्वच्छ पाण्यात निलगिरी तेलाचे काही थेंब मिसळा. हे तेल दार, खिडक्या पडदे, दरवाजे किंवा कपड्यांवर फवारा.
पावसाळा सुरू होण्याआधी खिडकीला, बाल्कनीला बारीक जाळी (मच्छरदाणीची जाळी) लावा. जेणेकरून हवा खेळती राहील आणि कीटक आत येणार नाहीत.
पावसाळ्यात छोटे कपडे घालण्यापेक्षा घरी देखील पूर्ण शरीर कव्हर होईल असे कपडे घाला. पावसाळ्यात सैल आणि फिकट रंगाचे कपडे वापरा, जे तुमचे हात आणि पाय पूर्णपणे झाकतील.