Agriculture Minister Manikrao Kokate faces backlash after a viral rummy video and controversial beggar government remark Saam Tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate: कृषीमंत्री पुन्हा बरळले, 'शासन भिकारी' मुख्यमंत्र्यांची कोकाटेंना तंबी

Rummy Video Of Kokate During: अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळणारे कृषीमंत्री कोकाटे पुन्हा बरळलेत. शासन भिकारी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावलंय.

Omkar Sonawane

पत्रकारांनी विचारलेल्या राजीनाम्याच्या प्रश्नावर कृषीमंत्र्यांनी व्यक्त केलेला हा संताप...विधानपरिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कृषीमंत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले... त्यातच मी रमी खेळलो नाही, राजीनामा देणार नाही अशी भूमिका कोकाटेंनी मांडलीय.

दुसरीकडे रोहित पवारांनी कोकाटेंचा दुसरा व्हिडीओ पोस्ट करत कोकाटेंना प्रतिआव्हान दिलंय. 42 सेंकदाच्या या व्हिडिओत सभागृहाचं कामकाज सुरू असल्याचं आवाजावरून दिसतंय. तसंच सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कोकाटेंचं विधान धडधडीत खोटं असल्याचाही दावा रोहित पवारांनी केलाय.

यापूर्वीही असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या कोकांटेविरोधात विरोधक आक्रमक झालेत...महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

दरम्यान पीकविम्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना कोकाटेंची जीभ पुन्हा घसरलीय. त्यांनी शासनाला चक्क भिकारी म्हटलंय. दरम्यान कोकाटेंच्या रमी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचीही नाराजी लपून राहिली नाही. त्यांनी कोकाटेंना तंबी दिलीय.

गेल्या काही महिन्यात सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या कोकाटेंना सीएम कोट्यातील फ्लॅट प्रकरणातही कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. मंत्र्यांच्या अशा कारनाम्यांमुळे महायुती सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळेच कोकाटेंची मंत्रिमंडळातून गच्छंती निश्चित मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाणी टंचाई

Prajakta Mali: दिवाळीसाठी प्राजक्ता माळीचा खास लूक; PHOTO पाहा

Virender Sehwag Birthday: अंपायरला भारतात करून दिली शॉपिंग आणि पुढच्याच सामन्यात...! वीरूने ऐकवलेला भन्नाट किस्सा

Airtel Recharge Offer: एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन, किंमत किती?

माजोरड्या रिक्षाचालकाचा भर रस्त्यात तरुणीवर हल्ला|VIDEO

SCROLL FOR NEXT