Kokan latest Political News Saam Tv News
महाराष्ट्र

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

Kokan latest Political News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये प्रवेश करणार. १९ ऑगस्ट रोजी मुंबईत देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. नितेश राणे म्हणाले, "प्रवेशामुळे भाजप अधिक मजबूत होईल."

Bhagyashree Kamble

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये प्रवेश करणार.

  • १९ ऑगस्ट रोजी मुंबईत देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.

  • नितेश राणे म्हणाले, "प्रवेशामुळे भाजप अधिक मजबूत होईल."

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोकणात भाजपला मोठा लाभ होण्याची शक्यता.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात फोडाफोडीचं राजकारण तापलं आहे. अशातच कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. शरद पवार गटातील बडे नेते भाजपच्या गळाला लागला आहे. मंत्री नितेश राणे यांची यासंदर्भात माहिती दिली आहे. या पक्षप्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रशांत यादव हे रत्नागिरी- चिपळूण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते. मात्र, आता त्यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशांत यादव रविंद्र चव्हाण यांच्या संपर्कात असून, त्यांनी पक्षप्रवेशासंदर्भात रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.

प्रशांत यादव यांच्या पक्षप्रवेशाबाबत नितेश राणे म्हणाले, 'प्रशांत यादव खांद्याला खांदा लावून काम करतील, तर भाजप अधिक मजबूत होईल. यासंदर्भात रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा झाली असून, प्रवेश निश्चित आहे.'

राणे म्हणाले, 'गावोगावी आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. किरण सामंत, निकम यांना प्रत्येकी २० कोटी रुपये दिले, तर नारायण राणे यांना ५ कोटी रुपये दिले आहेत. भाजपशिवाय मित्रपक्ष निवडून येऊ शकत नाहीत. आमची ताकद आम्ही दाखवून देऊ.'

'चिपळूण गाळ संदर्भात मी लवकरच एनओसी देणार असून, मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांना कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रयत्न करू', असे राणे यांनी स्पष्ट केलं. तसेच, 'मुंबई महानगरपालिकेवर भगवाधारीच बसतील. ‘लोहे पे लोहा काटता है’ तसे आमचे विनय नातू आहेत,' असेही त्यांनी म्हटले.

याशिवाय, 'भास्कर जाधव बोलत आहेत ती उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. त्याचे पडसाद जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कसे उमटतात ते पाहू. हर्णे बंदरातही नक्की बदल दिसेल,' असं राणे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

SCROLL FOR NEXT