Manoj Jarange Patil On Maratha Reservation Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: विधानसभा निवडणुकीआधी आरक्षण मिळवावंच लागेल, मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले? वाचा...

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.

विनोद जिरे

एकदा निवडणूक झाली की, कोण कोणाला विचारणार नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याला आरक्षण मिळवावे लागणार आहे, असं वक्तव्य मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. बीडच्या पिंपळवंडी येथे घोंगडी बैठकीत ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''मी मोठे होण्यासाठी हा लढा नाही. हा मराठ्यांचा लढा आहे. माझ्या स्वार्थासाठी ही लढाई नाही. माझा गरीब मराठा मोठा व्हावा, म्हणून हा संघर्ष सुरू आहे.'' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा लक्ष्य करत ते म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस सशापेक्षा भित्रे आहेत. ओबीसी आणि मराठा दंगल व्हावी, असे त्यांना वाटत होते. सरकारला दंगली घडवायच्या आहेत, मात्र मराठ्यांनी शांत राहावे.''

पुन्हा मुंबईत आरक्षणाची लढाई?

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत की, ''जो मराठ्यांच्या हिताचा तोच आपला. आता सगळ्यांना पुन्हा एकदा मुंबईला घेऊन जातो आणि येताना आरक्षण घेऊन येतो. सरकारला मराठ्यांची दयामाया येत नाही. सरकार आता मराठ्यांना मराठ्यांच्या विरोधात उतरवत आहेत. मी समाजाला माझा मायबाप मानले आहे. मराठ्यांच्या मुलांना आरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. 17 तारखेला सरकारच्या विरोधात अंतरवाली येथे उपोषण सुरू होणार आहे. माझ्यासमोर पर्याय नाही.'' त्यांनी असं म्हणताच यावेळी उपस्थित लोकांमधून उपोषण न करण्याची जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली.

जरांगे पुढे म्हणाले, ''सरकारला मी मॅनेज होत नाही, हे सरकारचे मोठे दुखणे आहे. म्हणून ते माझ्या मागे लागले आहेत. आमरण उपोषण हीच माझी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा उपयोग मी तुमच्यासाठी करणार. सरकारने मला मारायचा ठरवलं आहे. मला उघड पाडायचे ठेवलं आहे. सगळीकडून मला घेरलं जात आहे. कारण मी त्यांच्या ऐकत नाही. तुम्हाला आरक्षण मागत आहे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना माहित नाही मला मारणं सोपं नाही.''

ते म्हणाले, ''सरकारने मला गोळ्या घालाव्यात, माझा बळी घेतला तरी मी मराठा समाजाचा विश्वास कधी तोडणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे. मला तुमचे काही नको फक्त तुम्ही मला साथ द्या, यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण आणतो.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT