Knife Attack on a Young man over a bathing argument; The young man died on the spot in igatpuri Saam Tv
महाराष्ट्र

Igatpuri Crime : अंघोळीच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला; तरुणाचा जागीच मृत्यू

Igatpuri Crime News : ईगतपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: इगतपुरी तालुक्यात किरकोळ वादातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ईगतपुरीत भरदिवसा चाकूहल्ला (Knife Attack) करून तरुणाचा खून (Murder) झाला आहे. ईगतपुरी (Igatpuri) शहरातील रेल्वे तलावावर अंघोळीसाठी गेलेल्या तरुणावर चाकूहल्ला करून वार करण्यात आल्यानं या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर संशयित आरोपी फरार झाले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. (Knife Attack on a Young man over a bathing argument; The young man died on the spot in igatpuri)

हे देखील पाहा -

विशाल ठवळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो आपल्या मुलासोबत आणि भाच्यासोबत रेल्वे तलावावर अंघोळीसाठी गेला होता. त्याचवेळी २ तरुणी आणि २ ते ३ तरुण त्या ठिकाणी मद्यपान करत होते. विशाल अंघोळीसाठी पाण्यात उतरल्यानंतर दोन्ही तरुणीही पाण्यात उतरल्या. विशालचे कपडे बाहेर असल्याने ते ओले होऊ नये, यासाठी विशालने तरुणींना समजावलं. त्यानंतर तरुणीसोबत असलेल्या २ तरुणांनी विशालशी हुज्जत घालून त्याला दम द्यायला सुरुवात केली.

या सर्व गोंधळात एका तरुणाने विशालच्या मानेवर चाकूने वार केल्याने विशालचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकारानंतर संशयित आरोपी फरार झाले असून ईगतपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

SCROLL FOR NEXT