Kisanrao Hundiwale Case Saam Tv
महाराष्ट्र

Kisanrao Hundiwale Case: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप

Akola Crime News: अकोल्यातील व्यावसायिक किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा निकाल अखेर लागला. या प्रकरणी १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Priya More

Summary -

  • किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणाचा निकाल लागला

  • १० आरोपींना न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

  • भाजप नेत्या सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील ५ सदस्यांना जन्मठेप

  • सुमन गावंडेंच्या नवरा आणि मुलांचा आरोपींमध्ये सहभाग

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यातील किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणाचा निकाल आज लागला. या प्रकरणी तब्बल १० जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. निवृत्त पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडेलाही जन्मठेप झाली. या प्रकरणात वकील म्हणून उज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील होते.

अकोल्यातील गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणाचा निकला आज लागला. आज जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी अंतिम युक्तीवाद पार पडला. या प्रकरणातील १० आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली. ६ मे २०१९ रोजी पोलिस अधिक्षकांच्या शासकीय बंगल्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात किसनराव हूंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती. आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या सहाय्याने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहणीत गंभीर जखमी झालेल्या त्यांचा किसनराव यांचा मृ्त्यू झाला होता.

किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश होता. यामध्ये सुमन गावंडे यांचे पती आणि निवृत्त पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे, मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, रणजीत गावंडे, धीरज गावंडे, प्रल्हाद गावंडे, दिनेश राजपुत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, मयूर अहिर, सूरज गावंडे या सर्वांचा समावेश आहे.

या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी करताना न्यायालयाने १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर फारसे पुरावे नसल्यामुळे ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. किसनराव हुंडीवाले हे अकोल्यातील प्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक होते. ते केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे जवळचे नातेवाईक होते. या हत्या प्रकरणाची सुनावणी गेल्या ६ वर्षांपासून सुरू होती अखेर किसनराव हूंडीवाले यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: बेट्या जेवढं तुझं वय आहे ना..., भाजपचे माजी मंत्री आणि अजित पवारांच्या आमदाराचा एकमेकांवर जोरदार प्रहार

Animal Facts: कोणत्या प्राण्याला असतात ५ हृदय? उत्तर वाचून विश्वासच बसणार नाही

Maharashtra Live News Update: ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे पक्षाच्या गटनेतेपदी पवन कदम यांची निवड करण्यात आली

Chicken Chilli Recipe: घरी हॉटेल स्टाईल चिकन चिली कशी बनवायची?

प्रसिद्ध अभिनेत्याचा MMS व्हिडिओ व्हायरल? सिनेसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT