kisan congress organises nandurbar to nagpur shetkari samvad yatra says parag pashte saam tv
महाराष्ट्र

Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

नागपूर येथे ११ डिसेंबरला या यात्रेचे मोर्चात रूपांतर होईल असेही पराग पष्टे यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News :

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान काँग्रेसच्या वतीने ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत शेतकरी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे (parag pashte) यांनी वर्धा येथे आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत यात्रे संदर्भात माहिती दिली. (Maharashtra News)

पराग पष्टे म्हणाले राज्यातील शेतकरी विविध कारणांनी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकराने राज्यात सरसकट तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, सर्व प्रकारच्या पिकविम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी, सोयाबीन, कापूस, धान या पिकांसह सर्व पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, जंगली जनावरांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी विशेष पिकवीमा लागू करावा या व अन्य मागण्यांसाठी ही यात्रा आहे.

पराग पष्टे पुढे बाेलताना म्हणाले नंदुरबार ते नागपूर अशी ही यात्रा असेल. ही यात्रा प्रत्येक दिवशी १० किलोमिटरची असणार आहे. ४ डिसेंबरला नंदूरबार जिल्ह्यातून ही यात्रा सुरू होऊन धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरवती, वर्धा या जिल्ह्यातून नागपूरला पाेहचेल. नागपूर येथे ११ डिसेंबरला या यात्रेचे मोर्चात रूपांतर होईल असेही पराग पष्टे यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT