kirit somaiya bhavna gawali 
महाराष्ट्र

साेमय्यांच्या ७ काेटी रकमेच्या प्रश्नावर खासदार गवळींचे हे उत्तर

गजानन भोयर

वाशिम : किरीट सोमय्या kirit smoayia आणि मी जूने सहाकारी आहाेत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मी त्यांना समाेरा समाेर बसून उत्तर येईन. त्यांनी यावे आमच्याकडे असे शिवसेना खासदार भावना गवळी Bhavana Gawali यांनी आज (साेमवार) येथे स्पष्ट केले. किरीट सोमय्या यांनी खासदार गवळी यांच्या कार्यालयात झालेली सात काेटींची रक्कम आली काेठून असा प्रश्न केला आहे. त्यावर खासदार गवळींनी किरीट साेमय्यांना kirit somaiya bhavna gawali उत्तर समाेरा समाेर देईन असे नमूद केले आहे.

किरीट सोमय्या यांनी आज (साेमवार) सकाळी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे पाच वाजता सात काेटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7/7/2019 रोजी सकाळी 5 वाजता ₹7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलिस ठाण्यात केली आहे. एवढी रोख रक्कम आली कुठून? असा प्रश्न समोय्या यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान किरीट साेमय्या यांनी केलेल्या आराेपांबाबत खासदार भावना गवळी म्हणाल्या ते आमचे जूने सहकारी राहिलेले आहेत. त्यांनी येऊन मला बसून सांगावे हे असं कसं झालं मी त्यांना जरुर उत्तर देईन असे स्पष्ट केले.

याबराेबरच अन्य एका प्रश्नावर खासदार गवळी म्हणाल्या राष्ट्रीय महामार्गाचा विषय असल्याने मी गडकरी साहेबांना भेटून सगळ्या गोष्टी सांगणार आहे. काेणी तरी जाणून बुजून शिवसेनेला बदनाम करायचा डाव आहे सुरु आहे हे मी यापुर्वीच तुम्हांला सांगितले आहे. त्याचाच हा देखील भाग असल्याचे खासदार गवळींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT