kirit somaiya has criticized cm uddhav thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

'मुख्यमंत्रिपदासाठी स्वाभिमान विकलं'; सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका

सांगलीच्या आटपाडीमध्ये भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार टीका केली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुंबईत झालेल्या भाजपच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर चौफेर टीका केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आताही टीका सुरूच आहे. दरम्यान, सांगलीच्या आटपाडीमध्ये भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit somaiya ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आपलं स्वाभिमान विकलं, अशा शब्दात सोमय्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ते सांगलीच्या आटपाडीमध्ये बोलत होते.

हे देखील पाहा - (kirit somaiya has criticized cm uddhav thackeray )

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सांगलीतील आटपाडीमध्ये जोरदार निशाणा साधला आहे. सोमय्या म्हणाले, 'नरेंद्र मोदीच्या (Narendra Modi ) नावावर ज्यांनी मते घेतली त्यांनीच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आपलं स्वाभिमान विकलं. तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम या माफिया सेन्याच्या नेत्यांनी केलं, अशी खरमरीत टीका भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या ( kirit somaiya ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर केली.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले,'रामाच्या नावाने आणि भगवा झेंडा हातात घेऊन मतं मिळवली. आता आदाब करायला लागणाऱ्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रमधील जनता माफ करणार नाही'. 'वसुली आणि माफिया सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करण्याचा आम्ही विडा उचलला आहे. तो आम्ही करूनच दाखवणार, असं देखील सोमय्या म्हणाले.

सांगलीत सदाभाऊ खोत यांची महाविकास आघाडीवर टीका

सांगलीच्या आटपाडीमध्ये शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधाला. 'यंदा महाराष्ट्रभर हर्बल तंबाखूचा पेरा होऊ द्या, आम्हाला सरकारने हर्बल तंबाखूचे बियाणे द्यावे. एकदा आमची पण गरिबी हटू द्या, अशी उपरोधात्मक मागणी सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. 'नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला. पण सरकारने तो हर्बल तंबाखू असे सांगितलं, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT