kiran samant meets narayan rane in kankavali near sindhudurg  saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : नारायण राणेंच्या भेटीनंतर 'ओम गणेश' वर किरण सामंत यांचे महत्त्वपूर्ण विधान

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Narayan Rane News :

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (ratnagiri-sindhudurg lok sabha constituency) जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हे सुरु असतानाच आता लोकसभेच्या (lok sabha election 2024) जागेसाठी भाजपाकडून नाव चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) व शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांचे बंधु किरण सामंत (kiran samant) यांची आज (शनिवार) या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील (kankavali) राणेंच्या ओम गणेश (om ganesh bungalow) या निवासस्थानी महत्त्वपूर्ण भेट झाली. (Maharashtra News)

दाेन्ही नेत्यांच्या भेटीत फारशी काही चर्चा झाली नसली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत किरण सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर किरण सामंत यांनी देखील महायुतीमध्ये वरिष्ठ ठरवतील तो उमेदवार असेल असे म्हटले. केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक असतील तर त्यांना देखील माझ्या शुभेच्छा असे महत्त्वपूर्ण विधान किरण सामंत यांनी केल्याने आता या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

लोकसभेच्या जागेवरून भाजप व शिवसेनेमध्ये दावे प्रति दावे होत असताना किरण सामंत यांनी आज कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी राणेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता अजून वाढवली आहे. आता लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार त्याची उत्सुकता अजून ताणली गेली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

Marathi News Live Updates : हिंदुत्वाच्या मुद्द्यानंतर आता नितेश राणे संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

Emotional Girls: या मुली असतात फारच हळव्या, जरा काही बोल्लं की लगेच रडतात

SCROLL FOR NEXT