सापाच्या आमिषाने बोलावून केला घात; कोल्हापुरातील माजी सैनिकाचा बुलडाण्यात खून Saam Tv
महाराष्ट्र

सापाच्या आमिषाने बोलावून केला घात; कोल्हापुरातील माजी सैनिकाचा बुलडाण्यात खून

मांडूळ साप देण्याचे आमिष दाखवून, कोल्हापुर मधील दोघांना बुलडाण्यात बोलावून त्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलडाणा : २ तोंडाचा मांडूळ साप देण्याचे आमिष दाखवून, कोल्हापुर मधील दोघांना बुलडाण्यात बोलावून त्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधत संबंधित दोघांना २ तोंडाचा मांडूळ साप देण्याचे आमिष दाखवले होते. कोल्हापूर जिल्ह्यामधील रहिवासी असणारे दोघेजण मांडूळ घेण्याकरिता बुलडाण्यात गेले होते, तर आरोपींना दोघांना जंगलात नेवून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हे देखील पहा-

यामध्ये कोल्हापुरातील एका माजी सैनिकाचा जीव गेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल आनंदा निकम आणि माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यामधील सावर्डे बुद्रुक येथील रहिवासी आहेत. संबंधित दोघांना पवार नावाच्या व्यक्तीने २ तोंडाचा मांडून देण्याचे आमिष दाखवले होते.

त्याकरिता पैसे घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा याठिकाणी बोलावले होते. दोघेही नांदुरा याठिकाणी पोहोचल्यावर आरोपीने दोघांना घेऊन जायला दुचाकी पाठवली होती. दोघांनाही वडोदा या ठिकाणी ३ किमी आतमध्ये बाभळीच्या जंगलात त्यांना नेले. या ठिकाणी आरोपींनी दोघांकडून १ लाख ६ हजार रुपयांची रोकड काढून घेतली होती. याठिकाणी दोघांनी मांडूळ सापाची मागणी केल्यावर, दोघांनाही झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

या मारहाणीत माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी निकम यांच्या नातेवाईकांना फोन पेवरून काही रक्कम पाठवायला लावली होती. एटीएममधून ही रक्कम काढून घेतली. यानंतर आरोपींनी संबंधित दोघांना पूर्णा नदीच्या पुलावर आणून पुलावरून खाली फेकले आहे. जखमी अवस्थेत निकम यांनी अनेक लोकांना मदत मागितली. पण त्यांना कोणी देखील मदत केली नाही.

शेवटी एका ॲम्ब्युलन्स चालकाने त्यांना उचलून, नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले होते. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत प्रल्हाद यांना मृत घोषित केले आहे. जखमी अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून नांदोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राणाजगजीतसिंह पाटील आणि आंबदास दानवे यांच्यातील वाद चांगलाच पेटला

Homemade face cleanser: मेकअप सोडा...चेहऱ्यावर येईल एकदम नॅचरल ग्लो; साबण्याच्या ऐवजी 'या' घरगुती क्लिंसरने धुवा चेहरा

Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरला कारची जोरदार धडक, वाहनांचा चक्काचूर

Heart attack symptoms: छातीत होणारी सततची जळजळ अॅसिडिटी समजू नका; ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Mumbai : मुंबईतील शाळेत धक्कादायक प्रकार! डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने आकारला ५० रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT