लातूर : अतिवृष्टीने नदी काठावरील ४ एकर शेतीतील सर्वच पिके सडून गेल्याने २ बँकेचे ८ लाख रूपये कर्जाची परफेड कशी करायची, या निराशेपोटी डोंगरगाव बॅरेजमध्ये उडी घेऊन लातुर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव या गावातील तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव या गावातील तरूण अल्पभूधारक शेतकरी अजय विक्रम बन (वय- २४) वर्षे या शेतकऱ्याची नदी पाञाच्या काठावर ४ एकर जमीन आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीने ४ एकरवरील सर्वच खरीप पिके पाण्यात गेल्याने संपूर्णपणे सडली होती. हजारो रूपयाचे बियाणे घालून, पेरणी केली.
हे देखील पहा-
मात्र, निसर्गाने दगा दिल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले पिके डोळ्यादेखत सडून गेल्याने बँक आॕफ महाराष्ट्र आणि जिल्हा मध्यवर्ती या २ बँकेकडून घेतलेले ८ लाख रूपये कर्ज कसे फेडावे या विवेचनातून सदरीला शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचले आणि आपले जीवन संपविले आहे. नदीकाठावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली होती.
मात्र सदरील शेतकऱ्याला फक्त ४ एकरचे केवळ ७ हजार रूपयेच मदत मिळाली आहे. दिवाळीसारखा मोठा सण सुध्दा या शेतकऱ्याने आर्थिक परिस्थितीमुळे साजरा केला नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई- वडील पत्नी एक ६ महिन्याचा मुलगा आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.