Vardha Crime Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक : वर्ध्यात १४ वर्षीय मुलीची हत्या; मृतदेह पुरला खड्ड्यात

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या पाच दिवसापासुन बेपत्ता होती. तिचा गावतीलच युवकाने गळा आवळून खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : वर्धालगत (Wardha) असलेल्या पवनार गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या पाच दिवसापासुन बेपत्ता  होती. तिचा गावतीलच युवकाने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळीच्या सुमारास उघडकीस आली. मृतक मुलीचे नाव रिताका काखे (१४) असे आहे. या घटनेने पवनार गावात एकच खळबळ उडाली.

पवनार गावातील अल्पवयीन मुलगी ही शनिवार पासुन गावातून बेबत्ता असल्याची तक्रार सोमवारी सेवाग्राम पोलिसात (Police) तिच्या आईने दिली होती. तक्रारीची दखल घेत सेवाग्राम पोलिसांनी आपले तपास चक्र फिरवीत मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता यात पवनार गावतीलच आरोपी सतीश जोगे वय ३० वर्षे ह्याला संशयावरून ताब्यात घेतले त्याला पोलीसी हिस्का दाखवताच तब्बल पाच तासांनी त्याने गावातील १४ वर्षीय अल्पवयीन रितीकाचा खुन केल्याची कबुली पोलिसांना दिली मात्र खून का केला याबाबत त्यांने मौन बाळगले आहे पोलीस तपास करीत आहे. 

हे देखील पाहा -

आरोपी सतीशने रितीकाचा सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दुपट्ट्याने गळा आवरुन खुन केला आणि मृतदेह नदीलगतच्या बेसरमच्या झाडाजवळ खड्डा करुन पुरला होता. आरोपीने घटनास्थळाची माहिती सेवाग्राम पोलिसांनी दिली पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. मृतदेह पुर्णपने नग्णावस्थेत आणि कुजलेल्या अवस्थेत होता.

यावेळी घटनास्थळी पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंकी, उप विभागीय पोलिस अधिकारी पियूश जगताप, सेवाग्रामचे ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थीत होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT