Nashik Crime अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

भयंकर! प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या; पत्नीसह 7 जणांना अटक

1 लाखांची सुपारी देऊन प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीनं घरातच केला खून

अभिजीत सोनावणे

नाशिक - पत्नीने प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीनं पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.1 लाखांची सुपारी देऊन प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीनं घरातच खून केला. अनैतिक संबंधात आडकाठी आणणाऱ्या पतीची पत्नीकडून सुपारी देऊन हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे निफाडमध्ये (Niphad) एकाच खळबळ उडाली आहे. (Nashik Latest Crime News)

हे देखील पहा -

हत्येनंतर पतीचा मृतदेह पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह फेकून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरु केला. या प्रकरणी पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीसह 7 जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

या घटनेबाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड येथील दत्तात्रय महाजन याने आपल्या इतर साथीदारांसह मिळून हा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित दत्तात्रय यास ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. दत्तात्रय याचे शोभा दुसाने हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण 7 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 3 कार, 6 मोबाईल व एक लाखाची रोकड हस्तगत केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT