यवतमाळमध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण; आईवडील व्याकुळ!  संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण; आईवडील व्याकुळ!

यवतमाळच्या आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा (डू) या गावात तीन वर्षाच्या मानवी नावाच्या चिमुकलीचे अपहरण झाले आहे. आई बाबांगाठी त्यांचं अपत्य म्हणजे शरीराबाहेर काढून ठेवलेलं 'काळीज' असतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal) आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा (डू) या गावात तीन वर्षाच्या मानवी नावाच्या चिमुकलीचे अपहरण (Kidnapping) झाले आहे. आई बाबांगाठी त्यांचं अपत्य म्हणजे शरीराबाहेर काढून ठेवलेलं 'काळीज' असतं. सोमवारी घरासमोर खेळणारी तीन वर्षाची चिमुकली अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली असून लहान मुलांची तस्करी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा मेसेज सोशल मिडीयावर फिरत असल्याने मुलांवर लक्ष्य देण्याबाबत आवाहन केले जात आहे.

हे देखील पहा :

दुधाचे ओठ आणि नाळ देखील न सुकलेल्या जेमतेम तीन वर्षे वय असलेल्या मानवी अविनाश चोले या चिमुरडीचे अपहरण करण्याचे पाप कुणी केले असावे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोटाचा पोटगोळा कुठे गेला, कुठे नाही ? याचा गावभर शोध घेतला. मात्र, चिमुरडीचा चार दिवसांचा कालावधी उलटूनही शोध लागला नाही. आर्णी पोलीस (police) युद्धस्तरावर शोध मोहीम राबवित आहे, विशेष पथक ही नेमलं आहे. मात्र, अद्यापही मानवी सापडली नाही. आईच्या दुधासाठी आसुसलेली चिमुरडी कुठे, कशी, असेल? काय करत असेल अशा नानाविध विचाराने मानवी चे आईवडील अस्वस्थ झाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT