Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या खवल्या डोंगरावरील घटना नेमकी कशामुळं घडली? कुणालच्या मावशीच्या दाव्यानं गूढ आणखी वाढलं meta ai
महाराष्ट्र

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या खवल्या डोंगरावरील घटना नेमकी कशामुळं घडली? कुणालच्या मावशीच्या दाव्यानं गूढ आणखी वाढलं

Khavdya Dongar Incident : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील तिघांच्या मृत्यूच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. एका महागड्या फोनसाठी मुलानं हे टोकाचं पाऊल उचललं आणि त्याची किंमत आई-वडिलांनाही जीव गमावून मोजावी लागली. या मुलानं फोनसाठी अशा प्रकारचं पाऊल उचलल्याचे सांगितलं जात होतं. पण मुलाच्या मावशीनं केलेल्या दाव्यानं या घटनेत ट्विस्ट आला आहे. कौटुंबिक आणि जमिनीचा वाद या घटनेमागे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Saam Tv

काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगरावर दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संपूर्ण कुटुंब यात उद्ध्वस्त झालं. अवघ्या १९ वर्षांचा कुणाल चांदुगडे यानं या डोंगरावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. मुलगा डोंगरमाथ्यावर अगदी टोकावर उभा होता. त्याला वाचवताना वडिलांनी हात पकडला. पण मुलानं वडिलांनाही खेचलं आणि दोघेही खाली पडले. काही कळण्याच्या आत आईनंही डोंगरावरून उडी मारली. यात तिघांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला आयफोनसाठी मुलानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होते. पण त्यात तथ्य नसल्याचं समोर आलं. यामागे वेगळीच कारणे असल्याचे आता दावे केले जात आहेत.

कुणालनं हे पाऊल का उचललं?

कुणाल आणि आई-वडिलांच्याही मृत्यूच्या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. २० वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळं कुणालनं हे पाऊल उचलल्याचं आता सांगितलं जात आहे. कुणालच्या मावशीनं याबाबत माहिती दिली आहे. कुणालचे वडील मुरलीधर हे ट्रक ड्रायव्हर असले तरी, त्यांना शेतीतून बरेच पैसे मिळत होते. कुणालला डॉक्टर व्हायचे होते. तो परीक्षा देणार होता. त्याच्याकडे आधीपासूनच २ आयफोन होते. कुणालच्या आईकडेही आयफोन होता. त्यामुळे कुणालने आयफोनसाठी आत्महत्या करणे शक्य नाही, असे तिचे म्हणणे आहे.

कुणालच्या मावशीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात २० वर्षांपासून जमिनीसंबंधित अनेक वाद होते. कु्णालच्या आईला घरच्यांकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. या सगळ्या त्रासाला कंटाळून मुरलीधर हे कुणाल आणि त्याच्या आईपासून दूर राहायचे. वडील एकत्र राहत नसल्याने कुणाल कायम निराश असायचा. त्यांच्यामध्ये वाद वाढत चालले होते. अनेक गैरसमज होत होते. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणालची आई आपल्या भावना व्यक्त करायची.

कुणालला आपल्या वडिलांचे प्रेम मिळत नव्हते. कौटुंबिक वादामुळे बापलेकांची ताटातूट होत होती. यामुळे कुणाल डिप्रेशनमध्ये होता. याआधी देखील २०२५ मध्ये कुणाल खवड्या डोंगरावर फक्त फिरण्यासाठी गेला होता. कदाचित कुणालला आत्महत्या करायची नव्हती, स्वत:ला अडचणीत टाकून फक्त आईवडिलांना एकत्र आणायचे तो प्रयत्न करत होता. त्याच प्रत्यनात असताना कुणालचा पाय घसरला असावा, असे कुणालच्या मावशीचं म्हणणं आहे.

Flight Glitch : ३७,००० फुटांवर तांत्रिक बिघाड;  ९ मिनिटांत २८,००० फूट खाली आले विमान,  'त्या' एका निर्णयाने टळला मोठा अपघात

Maharashtra News Live Update: राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे ठिय्या आंदोलन

Abhishek Sharma: ‘माझं एकच ध्येय...’ अभिषेक शर्माच्या या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

Drishyam 3 Collection : अजय देवगण बॉक्स ऑफिसचा बादशाह; ४ दिवसांत 'दृश्यम ३'ची ३०० कोटी पार कमाई

SCROLL FOR NEXT