Police intensify probe in Ketan Agarwal murder case as a third suspect with Beed connection emerges. saam tv
महाराष्ट्र

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

Ketan Agarwal Killed Third Suspect Beed Connection: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशातच आता सिया आणि चेतन नंतर तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झालीये. ही तिसरी व्यक्ती कोण आहे? आणि तिचा आरोपींशी काय संबंध आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आलीय... केतनच्या खूनाचा कट आधीपासूनच तिसऱ्या एका व्यक्तीला माहीत होता आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र आहे... आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला पुन्हा न्यायालीय कोठडी सुनावलेली असतानाच या प्रकरणात बीडच्या एका तरुणाची एन्ट्री झालीये.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात खुनाचे प्लॅनिंग करताना सिया आणि चेतनसोबत त्याचा वर्ग मित्रही सामील होता... सिया आणि चेतननं त्या तरुणालाही लोहगडावर येण्याचा आग्रह केला होता. मात्र तो तरुण 18 जूनला हत्येच्या दिवशी लोहगडावर गेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर चेतन पहिल्यांदा याच त्याच्या मित्राला भेटल्याचीही माहिती समोर येतेय... सिया देखील या तरुणासोबत बोलली असल्याची माहिती आहे. चेतनचा वर्ग मित्र बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनाच्या संपर्कात होता.

दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतला असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. तसंच या तरुणानं सिया आणि चेतनला केतनचा खून करू नका, असे सांगितल्याचंही समोर आलयं... पोलिसांनीही याप्रकरणात नवेनवे खुलासे होत असल्याचं सांगत सस्पेन्स आणखी वाढवलाय...

दरम्यान न्यायायालयात सिया आणि चेतनला पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी पोलिसांनी न्यायालयासमोर लास्ट सीन टुगेदर ही थिअरी मांडल्याचीही माहिती आहे...

मात्र या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊनही सियाचा माज काही कमी झालेला नाही....जेव्हा सियाला तपासणी आणि पंचनामा करण्यासाठी तिच्या घरी नेण्यात आलं... तेव्हा सियानं माध्यमांसमोर अश्लील हावभाव केल्याचा प्रकार समोर आलाय...त्यामुळे चेतनच्या मित्रामुळे या हत्येचं गूढ उकलणार का याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT