Monday Horoscope : सोमवार ठरणार भाग्याचा! ‘या’ 6 राशींना नोकरी-व्यवसायात मोठा फायदा; वाचा उद्याचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

सहकारी व जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल, मात्र अफवा, वाद-विवाद आणि अनावश्यक प्रलोभनांपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल.

मेष | Saam tv

वृषभ

मित्रांसोबत फिरणे आणि मनोरंजनाचे योग असून शिक्षण, स्पर्धा, करिअर व व्यवसायात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

स्वार्थ बाजूला ठेवून काम केल्यास परिस्थिती झपाट्याने अनुकूल होईल आणि कुटुंबासाठी वेळ दिल्याने प्रेम-स्नेह वाढेल.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

शुभ प्रस्ताव मिळण्याची शक्यता असून कुटुंबातील सामंजस्य वाढेल, मात्र प्रवास किंवा महत्त्वाच्या कामांमध्ये घाई टाळा.

kark | saam tv

सिंह

कौटुंबिक संपत्तीचे जतन करण्यासोबतच व्यवसायातील महत्त्वाच्या चर्चांना वेग मिळेल आणि आकर्षक संधी व शुभ बातम्या मिळू शकतात.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

व्यवसायातील अडथळे दूर होऊन आर्थिक स्थिती सुधारेल, नवीन करार मिळू शकतात आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा, महत्त्वाचे निर्णय घाईने न घेता बजेट व नियमांचे पालन करणे हिताचे ठरेल.

tula | saam tv

वृश्चिक

व्यवसायातील कामांना उत्साहाने पुढे नेत आर्थिक उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि प्रतिष्ठेसोबत जीवनमानही उंचावेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

नोकरी, करिअर आणि व्यवसायात संधी वाढतील असून अनुभव, शिस्त आणि चांगल्या व्यवस्थापनामुळे कामगिरीत लक्षणीय सुधारणा होईल.

धनू | saam tv

मकर

करिअर आणि व्यवसायात वेग वाढेल, व्यवसायातील अडथळे दूर होतील. वैयक्तिक व प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

मकर | Saam Tv

कुंभ

आरोग्याशी संबंधित संकेतांकडे दुर्लक्ष न करता कामकाजात शिस्त आणि तयारी ठेवावी तसेच करिअर-व्यवसायातील उदिष्टांवर लक्ष केंद्रित करा.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

महत्त्वाची कामं लांबणीवर टाकू नका. भागीदारीतील व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये चांगल्या संधी मिळतील.

Meen | Saam Tv

NEXT : पेरू की सफरचंद? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

immunity boosting fruits
येथे क्लिक करा