Aap In Pathari Gram Panchayat Election Saam TV
महाराष्ट्र

Gram Panchayat Election: महाराष्ट्रात पहिल्यांदाच केजरीवालांच्या 'आप'ची एन्ट्री; 'या' गावात आम आदमी पक्षाचा सरपंच

Pathari Gram Panchayat Election: इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा सरपंच निवडूण आला आहे.

अभिजीत घोरमारे

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat) निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत सध्या एका ग्रामपंचायतीच्या निकालाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी ग्रामपंचायतीने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. याचं कारण म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा सरपंच निवडूण आला आहे. भंडाऱ्यात आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच खाते खोलले आहे. पाथरी ग्रामपंचायतीत सरपंच पदाकरिता आम आदमी पार्टीच्या विद्या गुरुदास कोहळे या विजयी झाल्या आहेत. (Pathari Gram Panchayat Election)

विद्या गुरुदास कोहळे (आपच्या विजयी उमेदवार)

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.  (Latest Marathi News)

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT