Ashok Chavan Saam tv
महाराष्ट्र

Ashok Chavan News: 'मलाही जिवंत ठेवा, मी संपलो तर...', अशोक चव्हाण यांच्या विधानाने खळबळ

Nanded Politics News: मी संपलो तर तुम्ही कसे रहाल. तुम्ही उद्या कोणाला जाब विचारणार अशी भावनिक साद खासदार अशोक चव्हाण यांनी घातली. भोकर मतदार संघातील शेलगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड

Ashok Chavan News: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकांच्याआधी त्यांनी कमळ हाती घेतले मात्र निवडणुकीत त्याचा भाजपला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरुन अंतर्गत वाद सुरु झाल्याचीही चर्चा होती. अशातच आता अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

"तुम्ही मला जिवंत ठेवा आणि तुम्हीही रहा, मी संपलो तर तुम्ही कसे रहाल. तुम्ही उद्या कोणाला जाब विचारणार अशी भावनिक साद खासदार अशोक चव्हाण यांनी घातली. भोकर मतदार संघातील शेलगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. अशोक चव्हाण यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

आता "मी तुमच्या आवडत्या पक्षात आलोय तर आता कसलं भांडण आहे, आपलं काही धुऱ्यावरच भांडण नाही न, तुमचं भांडण माझ्या वडिलांशी असेल तर माझ्याशी असण्याचं काही कारण नाही आणि माझ्याशी तुमचं भांडण असेल तर माझ्या पोरीशी असण्याचे कारण नाही. तुम्ही आम्हाला सांगा तुमच्यासाठी कुठे कमी पडलो, येऊन सांगा पण तुम्ही सांगत नाही आणि उठसूट माझ्याबद्दल बोलत राहता.." असे अशोक चव्हाण म्हणाले.

तुम्ही मला जिवंत ठेवा आणि तुम्हीही रहा, मी संपलो तर तुम्ही कसे रहाल', तुम्ही उद्या कोणाला जाब विचारणार?
अशोक चव्हाण

तसेच माझ्यावर बोलल्याशिवाय काही लोकांना जमतच नाही, तरी मी तुमचं ऐकून घ्यायला तयार आहे. उगाच साहेब आमच्या गावात येऊ नका असं का? मी विकासात्मक कामे करण्यासाठी तुमच्यासोबत सदैव राहीन त्यामुळे तुम्ही मला जिवंत ठेवा आणि तुम्हीही रहा, मी संपलो तर तुम्ही कसे रहाल', तुम्ही उद्या कोणाला जाब विचारणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ukadiche Modak Dough: गणेशोत्सवासाठी परफेक्ट उकडीच्या मोदकाचे पीठ कसे मळावे? जाणून घ्या सविस्तर पद्धत

Maratha Reservation : पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द, अजित पवार तातडीने मुंबईला रवाना, मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार?

Pune Crime : प्रेमभंगातून तरुणाचे धक्कादायक कृत्य; डिलिव्हरी बॉय म्हणून येत प्रेयसीवर रोखली पिस्तूल, तरुणी थोडक्यात बचावली

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा उपयोग मतांसाठी - उदय सामंत

Priya Marathe : प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट व्हायरल, नवऱ्यासाठी लिहिला होता खास मेसेज

SCROLL FOR NEXT