KDMC  Saam tv
महाराष्ट्र

केडीएमसीत भाजप-शिंदेसेना-मनसेमध्ये शीतयुद्ध; नाव न घेता मनसेला इशारा, चर्चांना उधाण

Kalyan-Dombivli : कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या समीकरणावरून चर्चा रंगली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या सूचक विधानामुळे भाजप-मनसे संबंधांबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मनसे हे सत्तेच्या समीकरणात एकाच बाजूला असले, तरी स्थानिक पातळीवरील राजकीय संबंधांमध्ये तणाव कायम असल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या वाढत्या जवळिकीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जानेवारी २०२६ मध्ये मनसेने- शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर केडीएमसीतील सत्तासमीकरणात भाजप, शिंदेसेना आणि मनसे हे एकाच बाजूला आले. मात्र, स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध शिंदेसेना-मनसे असा संघर्ष आणि शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते राजू पाटील हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी निंदकाचे घर असावे शेजारी असे विधान केले. या विधानाचा संदर्भ राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या पद्धतीने लावला जात असून, चव्हाण यांनी नाव न घेता राजू पाटील आणि मनसेला लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांची घरे शेजारी शेजारी असल्याने या विधानाला अधिक राजकीय रंग चढला आहे. एकीकडे मनसेकडून चव्हाण यांच्यावर टीका सुरू असताना दुसरीकडे केडीएमसीत शिंदेसेना आणि मनसेची जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना-मनसे यांच्यातील स्थानिक राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याचदरम्यान डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र, भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अनुपस्थिती असल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी सेना-मनसे मैत्रीवर केलेले सूचक भाष्य महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, या मैत्रीचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाचे होणार, यावरही तर्क-वितर्क सुरू आहेत.

चव्हाण यांच्या विधानाचा अर्थ मनसेसाठीच धोका असल्याचा इशारा असा लावला जात आहे. मात्र, याबाबत चव्हाण यांनी थेट कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर मनसे नेते राजू पाटील तसेच शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naldurg Fort : बोरी नदीपासून पाणीमहालापर्यंत नळदुर्ग किल्ल्याची 'ही' ६ रहस्य तुम्हाला माहिती आहेत का?

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्यांचा सत्कार करणार

Sunday Horoscope : आज 'या' राशींना मिळणार मोठी संधी; कामाचा ताण होणार कमी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Weather Update : ऊन-सावल्यांचा खेळ अन् विजांचा कडकडाट! महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचे हवामान

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका लहान मुलांमध्ये का वाढतोय? 'या' ६ कारणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर...

SCROLL FOR NEXT