kavthe sarpanch jaitun shaikh missing saam tv news
महाराष्ट्र

Sarpanch : महिला सरपंचांच्या काळजीनं अख्ख गाव पडलंय चिंतेत

या घटनेची माहिती समजताच सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन मंद्रुपकर हे फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले.

विश्वभूषण लिमये

Solapur News : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावच्या सरपंच (sarpanch) जैतून शेख या बुधवारपासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत सलगर वस्ती पोलीस (police) ठाण्यात त्यांचा मुलगा सरदार शेख यांनी तक्रार नाेंदवली आहे.

बुधवारी सात सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेळ्या चारून येते असे सांगून त्या शेतात गेल्या होत्या. मात्र शेळ्या परत आल्या पण सरंपच शेख या घरी परतल्या नाही. कुटुंबातील दोन्ही मुलं, पती, सुना, नातवंडांनी सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेतला. पण त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही.

ग्रामस्थांना याची माहिती समजताच त्यांनी देखील आजूबाजूच्या शेतात आणि इतर ठिकाणी महिला सरपंच जैतूनबी शेख यांना शाेधले परंतु त्या आढळून आल्या नाहीत. अखेर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली. कवठे गावात बुधवारी सरपंच भाभी अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण गावच सुन्न झाले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावच्या प्रथम ग्रामस्थ सरपंचच गायब झाल्याने पाहुणे मंडळीही कवठे गावात मुक्काम ठोकून आहेत. सरपंच भाभीच्या कुटुंबाचा शेतीवर भार. शेतीवरच कुटुंबाची गुजराण शेतीच्या निमित्ताने गावातील सर्वांशी व्यवहार चालतो. त्यामुळे सरपंच कुटुंबाचे गावातील सर्वांशी चांगले संबंध आहेत.

शाेधलं सगळीकडं पण...

उस्मान यांच्या पत्नी जैतुनबी यांना गावातील लोक भाभी म्हणून ओळखतात. पण बुधवार पासून सरपंच भाभी गायब झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली आहे. गावालगत आणि शेताजवळच्या सर्व विहिरी, पाहुणे, इतर गावे, सभोवताल गावकऱ्यांनी पिंजून काढला आहे. सोशल मीडियावर फोटो टाकून शक्य तेवढ्या ठिकाणी पाठविले आहे. शेताच्या रस्त्याच्या बाजूच्या पाऊलवाटेला एक चप्पल आढळल्याने ग्रामस्थांनी जवळच्या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसले आहे. पण शोध लागला नसल्याचे मुलगा सरदारने सांगितले.

या घटनेची माहिती समजताच सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन मंद्रुपकर हे फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. ज्या शेतात सरपंच भाभी शेळ्या राखायला गेल्या होत्या त्याठिकाणी जाऊन शोध सुरू केला. गावातील प्रत्येकाची कसून चाैकशी केली. सापडलेल्या एका चप्पली वरून श्वान पथकास पाचारण केले. त्याला चपलीचा वास दाखवून शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण श्वान शेतात काही अंतरावर जाऊन घुटमळले.

एकही धागा हाती नाही

पाेलीसांनी सरपंच भाभी जैतून शेख यांचे पती उस्मान शेख, मुलगा सरदार शेख यांची देखील विचारपूस केली. राजकीय लोकांसोबत भांडण किंवा तक्रार झाली होती का याची देखील सविस्तर माहिती घेतली. पण पोलिसांच्या हाती अजूनही धागा लागला नाही. लवकरच सर्व माहिती समोर येईल अशीही चर्चा पोलीस अधिकारी करत होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT