तलावाकाठी गावक-यांना दिसली सायकल, कपडे, चपला; चिमुकल्याच्या आजीचा उडाला थरकाप

सौंदड येथील मासेमारांना शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले.
drowned , youth, bhandara
drowned , youth, bhandaraSaamTv

Bhandara News : तलावावर आंघोळीला गेलेल्या मुलाचा बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना चकारा येथे घडली आहे. ही घटना घडल्यानंतर मुलाची (boy) शाेधा शाेध सुरु झाली परंतु ताे सापडला नाही. सुमारे चार तासांच्या शोध मोहीमेनंतर संबंधित मुलाचा मृतदेह आढळला.

गावालगतचा मालगुजारी तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील चकारा येथे उघडकीस आली आहे. भारत ओमप्रकाश पाठक (वय 15) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे पाठक कुटुंबियावर शाेककळा पसरली.

ओमप्रकाश हा अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवन येथे इयत्ता नववीच्या वर्गात हाेता. त्याची आई बाहेरगावी गेली होती. आजीने सकाळी त्याला जेवण करायला सांगितले. मात्र, बाहेर जाऊन लवकर येतो असे म्हणून तो घराबहाेर गेला. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या मालगुजारी तलावावर गावक-यांना सायकल कपडे व चपला दिसून आल्या. ही माहिती गावात समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबधित घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. सौंदड येथील मासेमारांना शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले. तब्बल चार तासानंतर ओमप्रकाशचा मृतदेह सापडला.

Edited By : Siddharth Latkar

drowned , youth, bhandara
Amravati : शिवाजी शिक्षण संस्थेत हर्षवर्धन देशमुखांचा वरचष्मा; ठाकरेंच्या पॅनलला दणका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com