Pahalgam Terror Attack Saam Tv
महाराष्ट्र

Pahalgam Terror Attack: बुलढाण्याच्या अख्ख्या कुटुंबाचा जीव थोडक्यात बचावला; ५ जणांसाठी हॉटेल मालक ठरला देवदूत

Pahalgam Terror Attack Update: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील ५ पर्यटकांचा जीव वाचला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर प्रसंगावधनतेमुळे काही लोकांचा जीव वाचला आहे. यात सध्या बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण पहेलगाम मध्ये अडकले आहेत. काल पहेलगाम मध्ये फायरिंग झाली तेव्हा पाच जण तेथील हॉटेल मधेच होते.

बुलढाण्यातली हे पाचजण हॉटेलबाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले.त्यांना सांगितले की, फायरिंग सुरु झाली आहे.बाहेर फिरायला पडू नका. बुलढाण्यातील पाच जण 18 तारखेला फिरायला जम्मू काश्मीर मध्ये गेले होते.यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत.सकाळ चे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व तीन मुले असा समावेश आहेत.

जेव्हा फायरिंग होत होती तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते. फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता. सध्या हे कुटुंब जैन परिवार हॉटेल मध्येच आश्रयला आहे. एकूण 5 लोक आहेत. यामध्ये २ महिला , ३ पुरुषांचा समावेश आहे.काश्मीरमध्ये अडकलेल्या या पाच जणांची नावे निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी आहेत.

18 तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीरला निघाले होते. जम्मू काश्मीर मधील सर्व ठिकाणी फिरुन झाल्यानंतर 21 तारखेला रात्री पहलगामध्ये हॉटेलला आले. 22 ला सकाळी पहलगामध्ये फिरायला निघणार तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्यास सांगितले. आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT