
बीडच्या माजलगावमध्ये भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्याकांडाची घटना ताजी असतानाच माजलगाव पुन्हा हादरले आहे. माजलगावमध्ये धारधार शस्त्राने वार करत हॉटेल मालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हॉटेलचे बिल भरण्यावरून वाद झाला. ग्राहकांनी हॉटेल मालक आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल मालकचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माजलगावमध्ये आठवडाभरात हत्याकांडाची दुसरी घटना घडली. त्यामुळे पोलिस प्रशासन करतंय तरी काय? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगावमध्ये हॉटेल मालक आणि त्याच्या मुलावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालक महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला. बिल देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहकांनी हॉटेल मालकावर आणि त्यांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी रोहित शिवाजीराव थावरेने आपल्या साथीदारांच्या मदतीने दोघांवर हल्ला केला होता. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगावमध्ये एका हॉटेलमध्ये बिल देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहकांकडून हॉटेल मालक महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालक महादेव गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माजलगाव मार्गावर असलेल्या नागडगाव पाटी कॉर्नरवर महादेव गायकवाड यांचा गावरान ढाबा आहे. या ढाब्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास रोहित शिवाजीराव थावरे आपल्या मित्रांसोबत आला होता. यावेळी रोहितचा हॉटेल मालक महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलासोबत बिलाच्या कारणावरून वाद झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की रोहित आणि त्याच्या मित्रांनी महादेव गायकवाड यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केले. त्याचसोबत महादेव यांच्या मुलावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये महादेव आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी महादेव यांना बीडमध्ये प्राथमिक उपचार करून संभाजीनगर येथे हलवण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ६ आरोपींविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.