Uddhav thackeray
Uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

Kasba Peth Election Result: बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kasba Chinchwad By-Election Result: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे निकाल सध्या हाती येत आहेत. यामध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.

सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला आणि भाजपसाठी हा सर्वात मोठा मानला जात आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. या सर्व निकालानंतर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Chinchwad)

काय म्हणाले उद्धव ठाकरे...

"कसब्यामध्ये पोटनिवडणूक जिंकल्यानंतर मला आनंद नक्कीच झाला आहे. एवढ्या वर्षांच्या एका भ्रमातून कसबा मतदारसंघ जर बाहेर पडत असेल, तर देश बाहेर पडायला काहीच अडचण नाही, टिळकांच्या घराण्याचा वापर करून भाजपने त्यांना बाजूला करून टाकलं. तो राग मतदारांच्या मनात होता," असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

तसेच एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर पडत असेल तर देशही बाहेर पडेल. शिक्षक आणि पदवीधरचे निकाल बोलके आहेत. या पोटनिवडणुकीत इतक्या वर्षाच्या प्रभावाखालून मतदारांनी वेगळा विचार केला हे आशादायक चित्रं आहे," असेही ते यावेळी म्हणाले.

याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "गिरीश बापटांचा उमेदीचा काळ मी पाहिला आहे. त्यांचा फोटो मी पाहिला की ऑक्सिजनच्या नळ्या लावून त्यांना प्रचाराला आणलं. मनोहर पर्रीकरांकडूनही तसाच प्रचार करून घेतला, भाजपची निती वापरा आणि फेका आहे. ती निती ते सर्वत्र वापरतात. शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला," अशी टीकाही केली.

काय म्हणाले अजित पवार....

दरम्यान, या विजयानंतर अजित पवारांनीही (Ajit Pawar) शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. "हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगत ज्या प्रकारे शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. ते जनतेला आवडले नसून शिंदे फडणवीस सरकार जनतेला अमान्य असल्याची" टीका त्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

SCROLL FOR NEXT