Pomegranate Juice: डाळिंबाचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती; 'या' वेळी प्यायल्यास मिळतील भरपूर फायदे

Surabhi Jayashree Jagdish

डाळिंबाचे फायदे

डाळिंब हे आरोग्यासाठी फायदेशीर फळ मानलं जातं. त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देण्यास मदत करतात. डाळिंबाचा ज्यूस नियमित प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकतं.

Best Time to Drink Pomegranate Juice | saam tv

डाळिंबाचा ज्यूस पिण्याची वेळ

रात्री झोपण्यापूर्वी डाळिंबाचा ज्यूस प्यावा की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते, हा ज्यूस पिण्यासाठी एकच ठराविक सर्वोत्तम वेळ नाही. तो नियमित पिणं आणि आपल्या शरीराला कोणती वेळ योग्य ठरते, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

Pomegranate Juice Before Bed | saam tv

हृदयाच्या आरोग्यासाठी डाळिंबाचा ज्यूस

हृदयाचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस आहारात समाविष्ट करता येतो. डाळिंबामध्ये पॉलीफेनॉल्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतात.

Pomegranate Juice Benefits | saam tv

सकाळी डाळिंबाचा ज्यूस पिणं

सकाळी नाश्त्यासोबत किंवा नाश्ता केल्यानंतर डाळिंबाचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे शरीराला काही प्रमाणात ऊर्जा मिळते. दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Blood Pressure Control | saam tv

दुपारी डाळिंबाचा ज्यूस पिणं

सकाळी ज्यूस पिणं शक्य नसेल तर दुपारीही तो पिऊ शकता. ज्यांचं पोट सेंसटीव्ह आहे त्यांना रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्यास त्रास होऊ शकतो. अशा व्यक्तींनी जेवणासोबत किंवा जेवणानंतर ज्यूस पिणं अधिक सोयीचे ठरू शकतं.

Antioxidants | saam tv

जेवणासोबत डाळिंबाचा ज्यूस पिणं

मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या असलेल्या व्यक्तींनी ज्यूस पिण्याच्या वेळेकडे लक्ष द्यावं. रिकाम्या पोटी ज्यूस पिण्याऐवजी तो संतुलित जेवणासोबत घेऊ शकता. त्याचप्रमाणे प्रोटीन असलेल्या आहारासोबत ज्यूस घेतल्यास रक्तातील साखरेवर होणारा परिणाम नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

Oxidative Stress | saam tv

रात्री झोपण्यापूर्वी डाळिंबाचा ज्यूस पिणं टाळा

डाळिंबाचा ज्यूस रात्री प्यायल्याने प्रत्येकालाच त्रास होतो असं नाही. पण काही व्यक्तींनी रात्री ज्यूस पिताना काळजी घेणं आवश्यक आहे. ज्यांना रात्री वारंवार लघवीला जावं लागतं किंवा ज्यूस प्यायल्याने पोटात त्रास होतो.

saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Natural Heart Health Tips | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Heart Attack Symptoms | saam tv
येथे क्लिक करा