Karuna munde Saam tv
महाराष्ट्र

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

Dhananjay Munde Faces Fresh Allegations from Karuna Munde: करूणा मुंडेंकडून धनंजय मुंडेंवर दोन गंभीर आरोप. न्यायासाठी करूणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Bhagyashree Kamble

  • करूणा मुंडेंकडून धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप.

  • मेहुणीवरील गैरकृत्य आणि आईच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावे.

  • करूणा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंडेंवर वारंवार आरोप करणाऱ्या करूणा मुंडे यांनी पुन्हा एकदा प्रसार माध्यमांसमोर धनंजय मुंडेंवर दोन गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंनी मेहुणीशी गैरकृत्य केल्याचा खळबळजनक आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे. दुसरा आरोप म्हणजे, धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आपल्या आईनं आयुष्य संपवलं, असं देखील करूणा मुंडे म्हणाल्या.

प्रसारमाध्यमांसमोर करूणा मुंडे म्हणाल्या, '२००५ साली धनंजय मुंडेंनी मेहुणीसोबत गैरकृत्य केलं. तिच्यावर जबरदस्ती केली. माझ्या बहिणीसोबत जे काही घडलं, तिनं सगळं कुटुंबियांना सांगितलं. तेव्हा मला नक्की काय घडलं? याची कल्पना नव्हती. नक्की बहीण दोषी आहे की नवरा? याबाबत काहीच माहित नव्हतं. पण बहिणीनं नक्की काय घडलं हे सांगितलं. तेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी आईनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण, काही दिवसांत तक्रार मागे घेण्यात आली', असं करूणा मुंडे म्हणाल्या.

'माझी आई मनोरमा शर्मा, माझा ड्रायव्हर या दोघांची देखील हत्या करण्यात आली. यासंबंधित माझ्याकडे पुरावे आहेत. सुसाईड नोट आहे. बहिणीनं मुंडेंनी बलात्कार केला असल्याचं सांगितलं, तेव्हा आई तक्रार दाखल करण्यासाठी जात होती. मात्र, आईवर दबाव टाकला होता. त्यामुळे माझ्या आईनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे सुसाईड नोट आहे', असं करूणा मुंडे म्हणाल्या.

'धनंजय मुंडे यांनी गुंडांची टोळी पाळली होती. माझ्याकडचे सर्व पुरावे बाहेर काढले, तर धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात राहणंही मुश्किल होईल', असं थेट आव्हान करूणा मुंडे यांनी दिला. तसेच, 'स्वत:च्या समाजाचे लोक त्यांना चपलेनं मारतील', असंही करूणा मुंडे म्हणाल्या.

न्यायासाठी मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट

करूणा मुंडे यांनी न्यायासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं. '४-५ दिवसाआधी मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. भेट घेऊन माझ्याकडचे सगळे पुरावे त्यांना दाखवले. त्यांच्याकडे मी न्याय मागितला. पण त्यांनी घरगुती भानगडीमध्ये पडत नसल्याचं सांगितलं', असं करूणा मुंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT