MAHARASHTRA POTHOLE CRISIS: KARJAT STUDENTS’ VIRAL PROTEST EXPOSES DEADLY ROAD CONDITIONS saam tv
महाराष्ट्र

कर्जतमध्ये छत्रीचा माईक अन् उपरोधिक रिपोर्टिंग, विद्यार्थिनींनी खड्ड्यांच्या समस्येकडे वेधलं लक्ष

Students Use Umbrella as Mic to Expose Pothole Crisis in Maharashtra: मोठमोठ्या खड्ड्यांमुळे राज्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीये. अशा रस्त्यांमुळे नागरिकांना आपला रोजचा प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागतोय. मात्र, खड्ड्यांकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जागं करण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थिनींनी अनोखी शक्कल लढवलीये. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

राज्यात सर्वत्र मोठंमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीये. या समस्येमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थीही हैराण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील विद्यार्थिनींनी रस्त्यांच्या दुरावस्थेकडे अनोख्या पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधलंय. प्रशासनाने रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष द्यावं, यासाठी विद्यार्थिनींनी केलेला उपरोधिक ग्राऊंड रिपोर्टिंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. शाळकरी मुलींनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची कशी पोलखोल केलीये, तुम्हीच पाहा...

विद्यार्थिनींनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येवर उपरोधिक शैलीत आवाज उठवलाय. तर दुसरीकडे, कोकणातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. गुहागर-विजापूर महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालीये.

चिपळूण ते पाटण दरम्यान तब्बल 1235 खड्डे पडलेत. यामध्ये काही खड्डे तब्बल 15 फूटाचे आहेत. चक्क मोजपट्टीनं मापून नागरिकानं 15 फुटांचा खड्डा पडल्याचं सांगत आंदोलनाचा इशारा दिलाय. मात्र ही स्थिती फक्त कोकणात नाही तर राज्याच्या अनेक भागात आहे. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे एक महिला आणि एका जवानाचा अपघातात मृत्यू झालाय. तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागलाय. शहरातील रस्ते मृत्यूच्या दाढेत ढकलत असताना ग्रामीण भागातील रस्त्यांचीही अवस्था दयनीय झालीये. त्यामुळे या शाळकरी मुलींच्या उपरोधिक 'ग्राऊंड रिपोर्टिंग'नंतर आणि नागरिकांच्या इशाऱ्यानंतर तरी सुस्त यंत्रेणेला जाग येणार का? की असाच त्रास सहन करत नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार? हाच खरा सवाल आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

SCROLL FOR NEXT