8-year-old girl physically assaulted by stepfather Saam Tv News
महाराष्ट्र

Karjat: संतापजनक! ८ वर्षांच्या चिमुकलीवर सावत्र बापाकडून लैंगिक अत्याचार; पत्नी झोपल्यानंतर करायचा दुष्कृत्य

8-year-old girl physically assaulted by stepfather: सावत्र बापानं आठ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. सकाळी आईला ही बाब समजल्यानंतर तिनं थेट पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

Bhagyashree Kamble

सचिन कदम, साम टिव्ही

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कर्जतमधून उघडकीस आली आहे. सावत्र बापानंच आठ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. सकाळी आईला ही बाब समजल्यानंतर तिची पायाखालची वाळू सरकली. तिनं थेट नराधम बापाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील शेलू येथे घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत

कर्जत तालुक्यातील शेलू येथे बापानं केलेल्या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जितेंद्र चोपडे असे आरोपीचे आहे. त्याच्याच आठ वर्षांच्या मुलीवर त्याची वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी चिमुकली आपल्या आई वडिलांसोबत झोपली होती. नंतर सावत्र बापाच्या डोक्यात सैतान घुसला.

त्यानं आपल्या मुलीसोबत दुष्कृत्य करण्यास सुरूवात केली. मुलीच्या आईला सकाळी ही धक्कादायक बाब समजल्यानंतर तिला संताप अनावर झाला. तिनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, नेरळ पोलिसांनी घटनेची चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक करून त्याची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान, सावत्र वडील वारंवार चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री झोपेत किंवा पत्नी घरी नसताना नराधम मुलीवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

Washim Flood : मुसळधार पावसाने कांचन नदीला पूर, रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद; शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

Maharashtra News Live Update: उद्या सकाळी ११ नंतर नसरापूर प्रकरणात न्यायालय शिक्षा सुनावणार

Papaya Eating Benefits: पपई खाल्ल्याने वजन खरंच कमी होते का? जाणून घ्या रोज पपई खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

SCROLL FOR NEXT