MSRTC Bus Attack In Karnataka Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus Attack: कर्नाटक-महाराष्ट्र वाद पेटणार? एसटी महामंडळाच्या बसला फासलं काळ; चालकाला मारहाण

MSRTC Bus Attack In Karnataka: कर्नाटकात चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झालाय. एसटी बसला काळं फासण्यात आलंय.

Bharat Jadhav

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमावादाचा प्रश्न वेळोवेळी उफाळून येत असतो. आता पुन्हा दोन्ही राज्यांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यातील वादाला खतपाणी घालणारी घटना कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे घडली आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला केल्याची घटना घडलीय.

पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे बस आल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडीगांनी बस थांबवली. त्यानंतर त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का? अशीही विचारणा केली. त्यानंतर बसला आणि चालकाला काळ फासण्यात आलं. चालकाला मारहाण देखील झाल्याची माहिती मिळालीय. या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.

कर्नाटकचा भाग असलेल्या बेळगावातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी बरीच आंदोलनं केली. पण कर्नाटकातील सत्ताधाऱ्यांनी राजकीय ताकदीने ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi Tukda Recipe: संध्याकाळी काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल शाही तुकडा

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

SCROLL FOR NEXT