kannad outram ghat closed for all types of vehicles from today sambhajinagar
kannad outram ghat closed for all types of vehicles from today sambhajinagar Saam Digital
महाराष्ट्र

Kannad Ghat : कन्नड घाटात आजपासून सर्व प्रकाराच्या वाहनांना बंदी, जाणून घ्या पर्यायी मार्ग

माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार कन्नडचा औट्रम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संपूर्ण रस्ता खराब झाल्याने हा घाट दुरुस्तीसाठी खंडपीठाच्या आदेशाने जड वाहतुकीसाठी बंद केला होता. आता १९ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत सर्व वाहनांसाठी रस्ता बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिले आहेत. (Maharashtra News)

त्यामुळे आता संभाजीनगरहून कन्नड घाटातून चाळीसगावकडे जाणारी वाहतूक ही संभाजीनगर-साजापूर- लासूर- गंगापूर- चौफुली वैजापूर- येवला-मनमाडमार्गे चाळीसगाव या मार्गाने वळविण्यात आली आहे.

संभाजीनगरकडून कन्नड - चाळीसगाव तलवाडा मार्गे घाटातून धुळ्याकडे साजापूर- मार्गावरून जाणारी वाहतूक सोलापूर-धुळे माळीवाडा समृद्धी महामार्गाने झांबरगावपर्यंत तेथून खाली उतरून गंगापूर चौफुली त्यानंतर वैजापूर-येवला-मनमाडमार्गे धुळ्याकडे जातील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संभाजीनगर ते चाळीसगाव-धुळ्याकडे जाणारी जड वाहने संभाजीनगर साजापूर- कसाबखेडा फाटा-देवगाव रंगारी- शिऊर-वैजापूर-येवला-मनमाड-चाळीसगावमार्गे जातील याची नागरिकांनी नाेंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat News: दहावीत मिळवले ९९.७० टक्के गुण, बोर्डातील टॉपर; निकालानंतर चौथ्या दिवशी विद्यार्थिनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

नवी मुंबई : बनावट नोटांच्या छापखान्यावर पाेलिसांची धाड, 2 लाखांच्या नाेटा जप्त; युवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : शेवाळेवाडीत कंटेनरचा अपघात, चालक आणि क्लीनरचा मृत्यू अपघातात मृत

SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती

SCROLL FOR NEXT