Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : दोन मोबाईल चोरटे पोलिसांच्या ताब्यात; सव्वा लाखांचे आठ मोबाईल जप्त

Kalyan News : नशा करून एक्सप्रेसमध्ये चढायचे, रेल्वे स्टेशनवर फिरायचे, प्रवासी झोपेत असल्याची संधी साधत त्यांचे मोबाईल फोन चोरून पसार होत.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: एक्सप्रेसमध्ये प्रवासी झोपेत असल्याचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना (Kalyan) कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख २२ हजार रुपये किमतीचे एकूण आठ मोबाईल (Mobile) जप्त केले. तसेच कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांची उकल त्यांच्याकडून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मेल एक्सप्रेस तसेच (Railway) रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्याने रेल्वे पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू होता. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे, पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने या चोरट्यांचा शोध सुरू केला. कल्याण रेल्वे स्टेशनवर (Kalyan Railway Station) रेल्वे पोलिसांच्या पथकाची गस्त सुरू असताना दोन जण त्यांना संशयितरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी (Railway Police) या दोघांनाही ताब्यात घेतले. फईमराज शेख व कैफ शेख असे या दोन चोरट्यांची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे आठ मोबाईल आढळले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ताब्यात घेतलेल्या चोरट्यांनी चौकशी केली असता सदरचे मोबाईल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. दोघेही मूळचे नाशिक येथे राहणारे आहेत. हे दोघं नशा करून एक्सप्रेसमध्ये चढायचे, रेल्वे स्टेशनवर फिरायचे, प्रवासी झोपेत असल्याची संधी साधत त्यांचे मोबाईल फोन चोरून पसार होत. या दोघांकडून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. या दोघांनी आणखी काही मोबाईल चोरी केल्याचे संशय पोलिसांना असून रेल्वे पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT