Dombivili Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dombivili Crime News: दागिन्यांच्या हौसेखातर पत्करला चोरीचा मार्ग; घरफोडी करणारी महिलेला अटक

Dombivili News दागिन्यांच्या हौसेखातर पत्करला चोरीचा मार्ग; घरफोडी करणारी महिलेला अटक

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : घरकाम करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवायची आणि त्याच घराची बनावट चावी बनवून घरात चोरी करणाऱ्या महिलेला (Dombivili) डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सि्सिटिव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलेला अटक करण्यात आली. सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम असे या आरोपी महिलेचे नाव आहे. (Police) पोलिसांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने असे मिळून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. (Maharashtra News)

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी बनावट चावीच्या आधारे घराचे कुलूप उघडून घरातील दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी घरात काम करणाऱ्या सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम या महिलेला अटक केली. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम ही घरकाम करण्याच्या बहाण्याने घरात ओळख वाढवायची. संधी मिळताच त्याच घराची बनावट चावी बनवत घरातील रोकड व दागिने लंपास केले होते. 

अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त 

सीमाचा पती सतत आजारी असतात. तिला महागडे कपडे, दागिने घालण्याचा देखील शौक आहे. यासाठी पैसे कमी पडत असल्याने तिने चोरीचा मार्ग निवडला होता. अशाच पद्धतीन तिने या आधी देखील एका घरात चोरी केली होती. सीमाला अटक केली तिच्याकडून एकूण दोन लाख ५५ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra : शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार, ३ दिवसांत अधिसूचना काढणार; कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: नागपुरात महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेचा प्रवास सुसाट

Lasun Khanyache Fayde: सकाळी रिकाम्यापोटी कच्चा लसून खा, हे 5 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

Mrugagad Fort : इतिहास ते सह्याद्रीचा ३६०° नजारा...,मृगगडाबद्दल कधी ऐकलंय का?

Walking for weight loss: वजन कमी करण्यासाठी रोज चालताय? पण या ७ चुका टाळा; नाहीतर वॉकिंगची मेहनत जाईल वाया

SCROLL FOR NEXT